खासगी कोविड रुग्णालयांनी आकारलेल्या देयकाचे ऑडिट
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 23, 2020 04:32 PM2020-10-23T16:32:24+5:302020-10-23T16:32:57+5:30
Washim, coronavirisu news तीन खासगी कोविड रुग्णालयांना जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे.
वाशिम : खासगी कोविड रुग्णालयांनी रुग्णांना आकारलेल्या देयकाचे ‘ऑडिट’ वाशिमचे उपविभागीय अधिकाºयांच्या पथकातर्फे केले जात आहे. दरम्यान उपविभागीय अधिकाºयांकडे प्राप्त तीन तक्रारीची चौकशी केली जात असून, याचा सविस्तर अहवाल पुढील कार्यवाहीसाठी जिल्हाधिकाºयांकडे पाठविला जाणार आहे. मार्च महिन्यापासून कोरोना विषाणू संसर्गाचा प्रादुर्भाव आहे. जिल्ह्यात आतापर्यंत तीन खासगी कोविड रुग्णालयांना जिल्हा प्रशासनाने परवानगी दिली आहे. या रुग्णालयांनी रुग्णांकडून दर आकारणी कशी करावी, याच्या मार्गदर्शक सूचना आरोग्य विभाग व राज्य शासनाने जारी केलेल्या आहेत. या मार्गदर्शक सुचनांना डावलून संबंधित रुग्णालय प्रशासनाने रुग्णाकडून जादा देयक वसुली केल्यास यासंदर्भात तक्रार करण्यासाठी उपविभागीय अधिकारी प्रकाश राऊत यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीकडे आतापर्यंत तीन तक्रार प्राप्त झाल्या आहेत. मंगल इंगोले यांनी रेनॉल्ड कोविड हॉस्पिटल, सुलोचना चंद्रवंशी व अशोक वºहाडे यांनी सिक्युरा कोविड हॉस्पिटलसंदर्भातील तक्रारीचा समावेश आहे. या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी केली जात असून, चौकशीअंती जिल्हाधिकारी यांच्याकडे अहवाल सादर केला जाईल, असे प्रकाश राऊत यांनी सांगितले.
खासगी कोविड रुग्णालयांनी जादा देयक आकारणी केल्याच्या तीन तक्रारी आल्या. त्यानुसार चाैकशी करण्यात येत आहे. चाैकशीअंती सविस्तर अहवाल पुढील कार्यवाहीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे सादर केला जाइल.
- प्रकाश राऊत उपविभागीय अधिकारी, वाशिम