मांडवा येथील रास्त धान्य दुकानाचे प्राधिकारपत्र रद्द
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:37 AM2021-04-03T04:37:59+5:302021-04-03T04:37:59+5:30
ज्ञानेश्वर कायंदे यांच्याविरोधात प्राप्त झालेल्या तक्रारीवरून, ३० जानेवारी रोजी पुरवठा निरीक्षक मुंडे यांनी दुकानातील कागदपत्रे व अन्य बाबींची तपासणी ...
ज्ञानेश्वर कायंदे यांच्याविरोधात प्राप्त झालेल्या तक्रारीवरून, ३० जानेवारी रोजी पुरवठा निरीक्षक मुंडे यांनी दुकानातील कागदपत्रे व अन्य बाबींची तपासणी केली. कायंदे लाभार्थी ग्राहकांना धान्यपुरवठा सुरळीत करीत नसल्याची तक्रार संतोष कायंदे यांनी केली होती. दरम्यान, चाैकशीत कार्डधारकांना माहे एप्रिल ते नोव्हेंबर २०२० चे मोफत धान्य देण्यात आले नसल्याची बाब निदर्शनास आली. यासह केवळ सहा महिन्यांचे धान्य वाटप केल्याचे सिध्द झाले. कार्डधारकांना धान्य खरेदीच्या पावत्या देण्यात आल्या नाहीत. शासनाने ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिक पैसे आकारण्यात आले. दुकानामध्ये भावफलक, धान्यवाटप फलक लावलेले नाही. भेटीपुस्तिका, तक्रारपुस्तिका आढळून आली नाही. रेकाॅर्ड तपासले असता ते अपूर्ण दिसून आले. या सर्व बाबींचे स्पष्टीकरण सदर दुकानदारास मागितले असता ते देखील सादर करण्यात आले नाही. त्यामुळे दुकानाचे प्राधिकारपत्र रद्द करण्याची कारवाई करण्यात आली.