बसस्थानक प्रवेशव्दार समोरच ऑटोंचा ठिय्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:42 AM2021-04-04T04:42:50+5:302021-04-04T04:42:50+5:30

वाशिम : येथील बसस्थानक प्रवेश व्दारासमोरच ऑटों उभे राहत असल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. आगार व्यवस्थापकांनी ऑटाेचालकांना ...

Auto parking in front of the bus stand entrance | बसस्थानक प्रवेशव्दार समोरच ऑटोंचा ठिय्या

बसस्थानक प्रवेशव्दार समोरच ऑटोंचा ठिय्या

Next

वाशिम : येथील बसस्थानक प्रवेश व्दारासमोरच ऑटों उभे राहत असल्याने प्रवाशांना त्रास सहन करावा लागत आहे. आगार व्यवस्थापकांनी ऑटाेचालकांना सांगून प्रवेश व्दारासमाेर उभे राहण्यास मज्जाव करण्याची मागणी प्रवाशांमधून होत आहे.

कृषीपंप जोडणी नाही; शेतकरी त्रस्त

किन्हीराजा : कृषीपंप जोडणीसाठी गत वर्षी परिसरातील ५० पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी महावितरणकडे अर्ज दिले होते. यापैकी जवळपास ४० शेतकऱ्यांना अद्याप कृषीपंप जोडणी मिळाली नाही. त्यामुळे सिंचन कसे करावे, असा प्रश्न शेतकऱ्यांना पडला आहे. याकडे संबंधितांनी लक्ष देण्याची होत आहे.

जऊळका येथे सुविधांचा अभाव

वाशिम : जऊळका रेल्वे जिल्हा परिषद गटातील अनेक गावांतील दलित वस्तीमध्ये मुलभूत सुविधा उपलब्ध नाहीत. रस्ते, पथदिवे, पाणीपुरवठ्याची सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. याकडे संबंधित यंत्रणेने लक्ष देण्याची मागणी नागरिकांनी सोमवारी जिल्हा परिषदेकडे केली आहे.

‘कोरोना’ बाबत जनजागृती

कामरगाव : येथील ग्राम सचिवालयात गुरुवारी ग्रामस्थांच्या उपस्थितीत ‘कोरोना’विषयक जनजागृतीसाठी बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीत ग्रामीण, रुग्णालय, खासगी डॉक्टरांसह पदाधिकाऱ्यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.

कृत्रिम पाणवठ्यांची साफसफाई

वाशिम : मंगरुळपीर येथील निसर्ग स्पर्श फाऊंडेशनच्या सदस्यांनी जंगलातील कृत्रिम पाणवठ्यांच्या सफाईचा उपक्रम हाती घेतला आहे. वन्यप्राण्यांसाठी हे पाणवठे भरले जाणार आहेत. यात वनोजा येथील कृत्रिम पाणवठ्याची साफसफाई शनिवारी करण्यात आली.

महामार्गाच्या फलकावर चुकीची माहिती (03wh02)

शिरपूर : शिरपूर-मालेगावदरम्यान राष्ट्रीय महामार्गाच्या फलकावर राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने चुकीची माहिती नमूद केली आहे. यात मिर्झापूरकडे जाणाऱ्या रस्त्याबाबतची माहिती चुकीची असून, त्यामुळे मिर्झापूर गावात जाणारे चालक थेट मिर्झापूर प्रकल्पावरच पोहोचत आहेत.

कोरोना जनजागृतीसाठी कार्यशाळा

शेंदुरजना आढाव : येथून जवळच असलेल्या हिवरा खु. येथे प्रशासनाच्या मार्गदर्शनात कोरोनाविषयक जनजागृतीसाठी कार्यशाळा घेण्यात येत आहे. यात सरपंच, उपसरपंच यांच्यासह ग्रामसचिवांच्या उपस्थितीत आरोग्य पथकाकडून ग्रामस्थांना मार्गदर्शन केले जात आहे.

Web Title: Auto parking in front of the bus stand entrance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.