शिरपुरात आॅटोरिक्षाच्या ठिय्यामुळे एसटी चालक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 03:47 PM2018-09-16T15:47:48+5:302018-09-16T15:48:11+5:30

शिरपूर जैन (वाशिम):  मालेगाव तालुक्यातील शिरपूर बसस्थानकासमोर अगदी रस्त्यालगत आॅटोरिक्षा आणि इतर वाहनांचा दिवसभर तळ राहतो. त्यामुळे एसटी चालकांना मार्ग काढणे कठीण होत आहे.

auto riksha at Shirpur bus stand, traffick jam | शिरपुरात आॅटोरिक्षाच्या ठिय्यामुळे एसटी चालक त्रस्त

शिरपुरात आॅटोरिक्षाच्या ठिय्यामुळे एसटी चालक त्रस्त

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
शिरपूर जैन (वाशिम):  मालेगाव तालुक्यातील शिरपूर बसस्थानकासमोर अगदी रस्त्यालगत आॅटोरिक्षा आणि इतर वाहनांचा दिवसभर तळ राहतो. त्यामुळे एसटी चालकांना मार्ग काढणे कठीण होत आहे. या वाहनांच्या दाटीमुळे अडचणीतून बस वळविताना किरकोळ अपघात घडत असल्याने चालक त्रस्त झाले आहेत. ही समस्या निकाली काढण्याची मागणी रिसोडच्या आगार व्यवस्थापकांनी शिरपूर पोलिसांकडे १५ सप्टेंबर रोजी निवेदनाद्वारे केली आहे.
मालेगाव तालुक्यातील शिरपूर हे जवळपास २५ हजार लोकसंख्येचे गाव आणि प्रसिद्ध तीर्थक्षेत्र आहे. त्यामुळे येथून दरदिवशी हजारो प्रवासी विविध ठिकाणाहून आवागमन करीत असतात. शिरपूर बसस्थानक हे रिसोड आगारांतर्गत येते. त्यामुळे येथे येणाºया भाविकांची संख लक्षात घेऊन आगाराच्यावतीने २५ बसफेºयांची सुविधाही ठेवली आहे. दर ४५ मिनिटांनी या बसफेºयांची वाहतूक सुरू असते. शिरपूर बसस्थानक परिसरात या बसफेºया नेआण करीत असताना चालकांना मोठी कसरत करावी लागते. बसस्थानकासमोरच आॅटोरिक्षा आणि इतर वाहने उभी राहत असल्याने चालकांना बस वळविणेच कठीण जाते. या संदर्भात बसचालकाने संबंधित वाहनधारकास वाहन बाजूला करण्याची विनंती केली, तर ते वाद घालून अर्वाच्च भाषेत संवाद साधतात, तर दाटीतून बस काढताना किरकोळ अपघात घडतो. त्यामुळे चालक त्रस्त झाले आहेत. याचा त्रास प्रवाशांनाही होतो. तेव्हा चालक आणि प्रवाशांना होणारा त्रास दूर करण्यासाठी आॅटोरिक्षा व इतर वाहनांना निश्चित वाहनतळाची व्यवस्था करून ही समस्या दूर करावी, अशी मागणी रिसोडच्या आगार व्यवस्थापकांनी शिरपूरच्या ठाणेदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे.

 

Web Title: auto riksha at Shirpur bus stand, traffick jam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.