१२३ प्रकल्पांत सरासरी १२ टक्के जलसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 11, 2017 01:55 AM2017-08-11T01:55:52+5:302017-08-11T01:58:22+5:30

वाशिम : यावर्षी पावसात सातत्य नसल्याचा जबर फटका प्रकल्पांतील जलसाठय़ांना बसत आहे. जिल्ह्यात एकूण १२३ लघु प्रकल्पात सरासरी केवळ १२ टक्के तर तीन मध्यम प्रकल्पात सरासरी केवळ २३ टक्के जलसाठा असल्याची नोंद पाटबंधारे विभागाच्या दप्तरी आहे. गतवर्षी याच कालावधीत यापैकी ५७ प्रकल्प ओव्हरफ्लो तर लघु प्रकल्पात सरासरी ७१ टक्के जलसाठा होता.

Average 12 percent water storage in 123 projects | १२३ प्रकल्पांत सरासरी १२ टक्के जलसाठा

१२३ प्रकल्पांत सरासरी १२ टक्के जलसाठा

Next
ठळक मुद्देगतवर्षी होते ५७ प्रकल्प ‘ओव्हर फ्लो’ तब्बल ६0 प्रकल्पांत शून्य जलसाठामध्यम प्रकल्पांत सरासरी २३ टक्के जलसाठा

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : यावर्षी पावसात सातत्य नसल्याचा जबर फटका प्रकल्पांतील जलसाठय़ांना बसत आहे. जिल्ह्यात एकूण १२३ लघु प्रकल्पात सरासरी केवळ १२ टक्के तर तीन मध्यम प्रकल्पात सरासरी केवळ २३ टक्के जलसाठा असल्याची नोंद पाटबंधारे विभागाच्या दप्तरी आहे. गतवर्षी याच कालावधीत यापैकी ५७ प्रकल्प ओव्हरफ्लो तर लघु प्रकल्पात सरासरी ७१ टक्के जलसाठा होता.
वाशिम जिल्ह्यात एकूण १२६ प्रकल्प असून, यामध्ये तीन मध्यम व १२३ लघु प्रकल्प आहेत. यावर्षी सुरुवातीपासूनच पावसात सातत्य नाही तसेच प्रकल्प परिसरात दमदार पाऊस झाला नाही. परिणामी, प्रकल्पांतील जलसाठय़ात अपेक्षित वाढ नसल्याचे आकडेवारीवरून दिसून येते. वाशिम शहराला पाणीपुरवठा करणार्‍या एकबुर्जी या मध्यम प्रकल्पात केवळ १५ टक्के जलसाठा आहे. गतवर्षी याच कालावधीत एकबुर्जी प्रकल्पाने १00 टक्क्याचा आकडा गाठून सांडव्यावरून पाणी वाहत होते. मध्यम प्रकल्प असलेल्या सोनलमध्ये आज रोजी केवळ एक टक्के जलसाठा आहे. गतवर्षी सोनल प्रकल्पात ८0 टक्के जलसाठा होता. मध्यम प्रकल्प असलेल्या अडाण प्रकल्पात आज रोजी २९ टक्के जलसाठा असून, गतवर्षी याच कालावधीत ६२.३६ टक्के जलसाठा होता.
वाशिम तालुक्यातील ३२ लघु प्रकल्पात सरासरी केवळ चार टक्के जलसाठा आहे. गतवर्षी याच कालावधीत सरासरी ४८.३४ टक्के जलसाठा होता. मालेगाव तालुक्यातील २२ प्रकल्पांत सरासरी आठ टक्के जलसाठा आहे. गतवर्षी याच कालावधीत सरासरी ५४.८७ टक्के जलसाठा होता. रिसोड तालुक्यातील १८ प्रकल्पांत सरासरी १६ टक्के जलसाठा आहे. गतवर्षी याच कालावधीत १८ टक्के जलसाठा होता. मंगरुळपीर तालुक्यातील १५ प्रकल्पांत सरासरी नऊ टक्के जलसाठा आहे. गतवर्षी याच कालावधीत ७३.0७ टक्के जलसाठा होता. मानोरा तालुक्यातील २३ प्रकल्पात सरासरी २0 टक्के जलसाठा आहे. गतवर्षी याच कालावधीत ७९.५३ टक्के जलसाठा होता. कारंजा तालुक्यातील १५ प्रकल्पांत सरासरी २२ टक्के जलसाठा आहे. गतवर्षी याच कालावधीत  ५५.0६ टक्के जलसाठा होता.
जिल्ह्यात एकूण ६0 प्रकल्पांत शून्य जलसाठा असून, यामध्ये वाशिम तालुक्यातील प्रकल्पांची संख्या सर्वाधिक आहे. वाशिम तालुक्यातील २६, मालेगाव तालुक्यातील नऊ, रिसोड तालुक्यात १२, मंगरूळपीर व मानोरा तालुक्यातील प्रत्येकी सहा आणि कारंजा तालुक्यातील एक अशा प्रकल्पांचा समावेश आहे.

वाशिम तालुक्यातील प्रकल्पांतील जलसाठय़ाची स्थिती भयावह
यावर्षी वाशिम तालुक्यात अल्प पाऊस झाल्याने प्रकल्पांत अत्यल्प जलसाठा असल्याचे दिसून येते. वाशिम तालुक्यात १0 बॅरेजेसची कामे झाली आहेत; मात्र दमदार पाऊस नसल्याने पैनगंगा नदीला पूर गेला नाही. परिणामी, सर्वच बॅरेजमध्ये उपलब्ध उपयुक्त जलसाठा शून्य टक्के आहे. दमदार पाऊस झाला नाही तर रब्बी हंगामात सिंचन कसे करावे? या चिंतेने बॅरेज परिसरातील शेतकर्‍यांची झोप उडाली आहे.

जलपातळीतही घट !
पावसाने दडी मारल्याने जलपातळीत घट येत आहे. याचा फटका ग्रामीण भागातील पाणीपुरवठा योजनांना बसत आहे. पावसात सातत्य नसल्याने विहिरींत पुरेशा प्रमाणात जलसाठा आला नाही. त्यामुळे काही गावांत पाणीपुरवठा आठ दिवसांवर गेला आहे.

Web Title: Average 12 percent water storage in 123 projects

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.