वाशिम जिल्ह्यातील हिरकणी कक्षांना टाळे

By admin | Published: December 22, 2014 01:25 AM2014-12-22T01:25:09+5:302014-12-22T01:25:09+5:30

बस स्थानकावर महिलांची कुचंबणा : आगार प्रशासनाचे दुर्लक्ष.

Avoid Hirakani Cells in Washim District | वाशिम जिल्ह्यातील हिरकणी कक्षांना टाळे

वाशिम जिल्ह्यातील हिरकणी कक्षांना टाळे

Next

वाशिम : भुकेल्या तान्हुल्याला स्तनपान देताना मातांची होणारी कुचंबणा रोखण्याचा गाजावाजा करीत महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने बस स्थानकावर सुरू केलेले हिरकणी कक्ष दिवसरात्र कुलूपबंदच राहतात. परिणामी, महामंडळाच्या मुख्य उद्देशालाच हरताळ फासल्या जात असून, मातांची कुचंबणा अद्यापही सुरूच आहे. लोकमतने २१ डिसेंबरला केलेल्या स्टिंग ऑपरेशनमधून ही बाब अधोरेखित झाली आहे.
महिलांना आपल्या तान्हुल्या बाळांना घेऊन एसटी तून प्रवास करावा लागत असतो. बस स्थानकावरील गोंधळ, गर्दी लाऊडस्पीकर, कर्कश आवाज यामुळे लहान मुले अधिक रडू लागल्याने मातांना त्यांना उघड्यावर दूध पाजावे लागते. परिणामी, त्यांची कुचंबणा होते. नेमकी हीच बाब हेरून राज्य परिवहन महामंडळाने प्रत्येक बसस्थानकावर मातांना सुरक्षित स्तनपान करता यावे यासाठी एक कक्ष सुरू केला आहे. जिल्ह्यातील वाशिम, कारंजा, मंगरूळपीर, रिसोड येथील बसस्थानही याला अपवाद नाही; मात्र धक्कादायक बाब म्हणजे, येथील गचाळ व्यवस्थापनामुळे हा कक्ष नेहमीच कुलूपबंद राहत असल्याचे दिसून येत आहे. रात्रीचे तर सोडा; पण दिवसाही या कक्षाचे कुलूप उघडायला प्रशासनाकडे वेळ दिसून येत नाही. परिणामी मातांची कुचंबणा सुरूच आहे. वाशिमप्रमाणेच इतर बसस्थानकावरील हिरकणी कक्षाची परिस्थिती आहे.

Web Title: Avoid Hirakani Cells in Washim District

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.