बदलीपात्र शिक्षकांना आस्थापनेची प्रतीक्षा!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 4, 2017 02:32 AM2017-10-04T02:32:39+5:302017-10-04T02:33:17+5:30
वाशिम: जिल्हा परिषदेच्या जिल्ह्यांतर्गत बदली प्रक्रियेंतर्गत जिल्ह्यातील संवर्ग १ आणि २ व ३ मधील १३९ शिक्षकांची यादी जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागाकडे प्राप्त झाली आहे; परंतु या बदली प्रक्रियेमुळे विस्थापित होणार्या शिक्षकांची ऑनलाइन अर्ज प्रक्रिया अद्याप पूर्ण झाली नसल्याने बदलीपात्र शिक्षकांच्या आस्थापनेची प्रक्रिया रखडली आहे. दरम्यान, या प्रक्रियेंतर्गत विस्थापित होणार्या १३९ शिक्षकांना पसंतीक्रमानुसार ऑनलाइन अर्ज सादर करण्यासाठी ४ ऑक्टोबर ही शेवटची मुदत असून, या मुदतीत अर्ज सादर करू न शकणार्या शिक्षकांना शासन निर्णयानुसार जिल्ह्यातील कुठल्याही शाळेवर रुजू केले जाणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

राज्यभरात गेल्या दोन महिन्यांपासून जिल्ह्यांतर्गत बदल्यांमधील पात्र शिक्षकांकडून ऑनलाइन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. शैक्षणिक वर्ष सुरू होऊन चार महिने होत आले तरी शिक्षकांच्या बदल्यांचा प्रश्न अद्यापही ऑनलाइन प्रणालीत अडकलेला आहे. या प्रक्रियेंतर्गत संवर्ग १, संवर्ग २, संवर्ग ३ आणि संवर्ग ४ अशा गटांमध्ये जिल्हा परिषद शिक्षकांच्या बदल्या होणार असून, जिल्ह्यातील १३९ बदलीपात्र शिक्षक आस्थापनेच्या प्रतीक्षेत आहेत. शासनाने काही दिवसांपूर्वी या बदली प्रक्रियेचे नवीन परिपत्रक काढून चालू शैक्षणिक वर्षात विलंब झाल्याने कमीत कमी बदल्या करण्याचा निर्णय घेतला व ३0 सप्टेंबरपयर्ंत मुदतही वाढवली होती. यानंतर वाशिम जिल्ह्या तील बदलीस पात्र असलेल्या संवर्ग १ आणि संवर्ग २ सह अधिकार प्राप्त १३९ शिक्षकांची यादी जिल्हा परिषदेच्या लॉगीनवर आली. त्यानंतर या १३९ शिक्षकांनी आपल्या पसं तीक्रमानुसार ऑनलाइन अर्जही सादर केले; परंतु या शिक्षकांच्या आस्थापनेनंतर विस्थापित होणार्या १३९ शिक्षकांचे संवर्ग ४ साठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया अद्याप पूर्ण झाली नसल्याने बदलीपात्र शिक्षकांची बदली प्रक्रिया प्रलंबित आहे. दरम्यान, बदली पात्र शिक्षकांमधील ८३ शिक्षक संवर्ग १ मधील आणि उर्वरित ५६ शिक्षक हे संवर्ग २, ३ आणि अधिकार प्राप्त शिक्षक असल्याचे जि.प. शिक्षण विभागाकडून घेतलेल्या माहितीवरून कळले आहे. पहिल्या टप्प्यातील संवर्ग १ व २ मधील शिक्षकांच्या बदल्या झाल्यानंतर संवर्ग ३ म्हणजे अवघड क्षेत्र तसेच संवर्ग ४ मधील शिक्षकांच्या बदल्या होणार असून, या गटांमधील शिक्षकांना ४ ऑक्टोबरच्या अंतिम मुदतीपर्यंत अर्ज करण्याचे कळविण्यात आले आहे. दरम्यान, या प्रक्रि येंतर्गत उच्च न्यायालयात दाखल याचिकेची सुनावणी अद्याप व्हायची आहे.
संवर्ग ४ साठी शिक्षकांना २0 गावांचा पसंतीक्रम
जिल्ह्यांतर्गत बदली प्रक्रियेंतर्गत संवर्ग १, २ आणि अधिकार प्राप्त मिळून १३९ शिक्षकांच्या नियुक्ती किंवा आस्थापनेसाठी १३९ इतर शिक्षकांना विस्थापित व्हावे लागणार आहे. आता या विस्थापित होणार्या शिक्षकांनाही त्यांना सोयीचे असलेले गाव मिळावे म्हणून २0 गावांचा पसंतीक्रम देण्यात आला आहे. या अंतर्गत संबंधित शिक्षकांना मुख्याध्यापकांच्या लॉगीनवर ऑनलाइन अर्ज करताना गावांची यादी दिसणार आहे. त्यामधील २0 गावे निवडून पसंतीक्रमानुसार ती अर्जात नमूद करावी लागणार आहेत. यानंतर शिक्षकांच्या पसंतीनुसार आणि रिक्त असलेल्या गावांचा प्राधाण्यक्रमाने विचार करून शासनस् तरावरूनच बदली प्रक्रिया पूर्ण होणार आहे.