लोकसहभागातील जलसंधारण कामासाठी पुरस्कार

By admin | Published: March 31, 2017 08:10 PM2017-03-31T20:10:25+5:302017-03-31T20:10:25+5:30

पाणी फांउडेशन च्या वतीने राबविण्यात येणा-या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेकरीता कारंजा तालुक्याची निवड करण्यात आली असून या स्पर्धेच्या माध्यमातून तालुक्यातील १०६ गावांनी प्रशिक्षण पुर्ण केले आहे.

Award for water conservation works in the public sector | लोकसहभागातील जलसंधारण कामासाठी पुरस्कार

लोकसहभागातील जलसंधारण कामासाठी पुरस्कार

Next

कारंजा लाड: पाणी फांउडेशन च्या वतीने राबविण्यात येणा-या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेकरीता कारंजा तालुक्याची निवड करण्यात आली असून या स्पर्धेच्या माध्यमातून तालुक्यातील १०६ गावांनी प्रशिक्षण पुर्ण केले आहे. स्पर्धेला ८ एप्रिल पासून प्रारंभ होत आहे. या स्पर्धेच्या काळात जे गाव लोकसहभागातून जलसंधारणाची उत्तम कामे करतील पाणी फाउडेंशनच्या बक्षिसा व्यतीरीक्त तालुक्यातील स्पर्धेत प्रथम व्दितीय व व्दितीय येणाऱ्या प्रत्येक गावांना प्रत्येकी १० लाखांचे  बक्षिस देणार असल्याची घोपणा आमदार राजेंद्र पाटणी यांनी केली. 
पाणी फाउडेंशनच्या वतीने राबविण्यात येणाा-या सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेच्या हेतूने तालुक्यातील १०६ गावांचा चार दिवसाचा प्रशिक्षण कार्यक्रम पार पडला. या गावातील जबाबदार व निरीक्षण यांची स्पर्धेच्या नियोजना संदर्भात दोन दिवसांची कार्यशाळा श्री गुरूदेव सेवाश्रम ग्रामनाथ भवन शांती नगर येथे पार पडली. यामध्ये पाटणी यांनी ही घोषणा केली. 

Web Title: Award for water conservation works in the public sector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.