रथ व कलापथकातून कॅन्सरबाबत जनजागृती, युवकांचा पुढाकार
By Admin | Published: December 22, 2016 03:44 PM2016-12-22T15:44:48+5:302016-12-22T15:44:48+5:30
अखिल भारतीय मारवाडी मंचच्या युवकांनी रथयात्रेद्वारे कॅन्सरबाबत जनजागृती केली.
>ऑनलाइन लोकमत
वाशिम, दि. २२ - कॅन्सर कशामुळे होतो, त्यापासून शरीराची होणारी हानी लक्षात घेता शहरातील अखिल भारतीय मारवाडी मंचच्या युवकांनी रथाद्वारे जनजागृती करुन आयोजित मोफत शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन केले जात आहे. अखिल भारतीय मारवाडी युवामंच व मिडटाऊन युवा शाखेच्या वतीने जनजागृती अभियानांतर्गत शहरातील महेश भवन येथे शुक्रवार, २३ व शनिवार, २४ डिसेंबर असे दोन दिवस सकाळी १० ते दुपारी ४ या वेळेत कर्करोग तपासणीचे मोफत शिबिर आयोजित करण्यात आले आहे. ‘डिटेक्शन व्हॅन’व्दारे रुग्णांची तपासणी करण्यात येणार असून याचा जास्तीत जास्त नागरिकांना लाभ व्हावा याकरिता जिल्हयात रथ व रथात कलापथकाच्यावतिने जनजागृती हाती घेण्यात आली आहे. या युवकांच्या कार्याचे जिल्हयात कौतूक केले जात आहे.