रॅलीव्दारे काेराेना लसीकरणाबाबत जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2021 04:23 AM2021-03-29T04:23:25+5:302021-03-29T04:23:25+5:30
यावेळी प्रत्येक दुकानदाराकडे जाऊन कोविड-१९ चाचणी करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले, तसेच प्रत्येक दुकानदाराने मास्क लावणे, सॅनिटायझर वापरणे व कोरोना ...
यावेळी प्रत्येक दुकानदाराकडे जाऊन कोविड-१९ चाचणी करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले, तसेच प्रत्येक दुकानदाराने मास्क लावणे, सॅनिटायझर वापरणे व कोरोना चाचणी केल्याबद्दलचे प्रमाणपत्र दुकानावर लावणे असे प्रत्येक दुकानदाराला समजावून सांगण्यात आले. तसेच मेडशी गावातील ४५ वर्षाच्यावर नागरिकांनी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात जाऊन लसीकरण करून घेण्यात यावे याबद्दल जनजागृती करण्यात आली. कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका असे या रॅलीद्वारे समस्त ग्रामस्थांना संबोधण्यात आले. या रॅलीमध्ये पंचायत समिती सदस्य कौशल्याबाई रामभाऊ साठे, सरपंच शेख जमीर शेख गनीभाई, उपसरपंच धीरज मंत्री, ग्रामसेवक मोहन वानखडे, तलाठी दत्तात्रय घुगे, ग्रा. पं. सदस्य मूलचंद चव्हाण, रमज़ानभाई गवरे, अमोल तायडे, ज्ञानेश्वर मुंडे, जगदीश राठोड, प्रसाद पाठक, शौकत पठाण, तंटामुक्त अध्यक्ष ज्ञानदेव साठे, ग्रामपंचायत सदस्य कैलास ढाले, अभिजीत मेडशीकर, गजानन झ्याटे, रामदास घुगे, मुकेश चव्हाण, दत्ता काळे आदींची उपस्थिती होती.