रिठद येथे दवंडीद्वारे कोरोनाबाबत जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:36 AM2021-03-14T04:36:41+5:302021-03-14T04:36:41+5:30
............. पोहरादेवी येथे आरोग्य तपासणी वाशिम : मानोरा तालुक्यातील पोहरादेवी येथे गत सहा, सात दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत ...
.............
पोहरादेवी येथे आरोग्य तपासणी
वाशिम : मानोरा तालुक्यातील पोहरादेवी येथे गत सहा, सात दिवसांपासून कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत असल्याने आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर आहे. आरोग्य विभागातर्फे नागरिकांची आरोग्य तपासणी केली जात आहे.
.............
वाशिमात अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था
वाशिम : शहरातील अंतर्गत रस्त्यांचे काही महिन्यांपूर्वी नूतनीकरण झाले; मात्र अल्पावधीतच रस्ते खराब झाले आहे. काही रस्त्यांना मोठमोठे खड्डे पडले असून वाहनचालक त्रस्त झाले आहेत.
..........
किन्ही येथे पाणीपातळीत घट
वाशिम : यावर्षी पिकांच्या सिंचनासाठी पुरेसे पाणी उपलब्ध झाले. आता मात्र कूपनलिकांची पाणीपातळी हळूहळू घटत चालली आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन ग्रा.पं.कडून करण्यात आले आहे.
...........
४८ गावांमध्ये मोफत रुग्ण तपासणी मोहीम
वाशिम : राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियानांतर्गत महिला उत्कर्ष प्रतिष्ठान, रिसोडद्वारा संचालित फिरते वैद्यकीय पथक वाशिम जिल्ह्यातील ४८ गावांमध्ये कार्यरत आहे. या पथकाद्वारे निवड केलेल्या ठरावीक ४८ गावांत गरोदर माता, स्तनदा माता, बालक व इतर रुग्णांची मोफत तपासणी व औषध वितरीत करण्यात येत आहे.