वाशिम तालुक्यात कोरोनाबाबत जागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 19, 2021 04:42 AM2021-05-19T04:42:11+5:302021-05-19T04:42:11+5:30
वाशिम तालुक्यातील ग्रामीण भागातही कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. १७ मे रोजी वाशिम तालुक्यातील अनसिंग येथे ६, अडोळी २, ...
वाशिम तालुक्यातील ग्रामीण भागातही कोरोनाबाधित रुग्ण आढळून येत आहेत. १७ मे रोजी वाशिम तालुक्यातील अनसिंग येथे ६, अडोळी २, ब्राह्मणवाडा १, चिखली १, देवठाणा ३, गणेशपूर १, घोटा येथील १, गिव्हा येथील १, हिवरा रोहिला १, इलखी १, कळंबा महाली येथील २, केकतउमरा येथील ३, कोकलगाव येथील २, नागठाणा येथील ३, पंचाळा येथील १, राजगाव येथील १, सावरगाव येथील १, सुकळी येथील १, तांदळी १, टो येथील १, तोंडगाव येथील १, उकळीपेन येथील २, उमरा शम. येथील २, उमरा येथील १, वाघजाळी येथील २, वाळकी जहांगीर येथील १, वारला येथील १, वारा जहांगीर येथील ४, एकांबा येथील २, जांभरुण येथील १, बोराळा येथील १ असे रुग्ण आढळून आले. खबरदारीचा उपाय म्हणून कोरोनाबाधितांच्या संपर्कातील संदिग्ध नागरिकांची तपासणी केली जात असून, लक्षणे आढळून येणाऱ्यांचे स्वॅब घेतले जाणार आहेत. नागरिकांनी विशेष खबरदारी घ्यावी, साबणाने हात वारंवार स्वच्छ धुवावे, चेहऱ्यावर मास्क किंवा रुमालचा वापर करावा, याबाबत आरोग्य विभागाकडून जनजागृती केली जात आहे. प्रतिबंधित क्षेत्रात सर्वेक्षण व आरोग्य तपासणी केली जात आहे. सर्दी, ताप व खोकला अशी लक्षणे दिसून येताच तातडीने आरोग्यवर्धिनी केंद्राशी किंवा कोविड केअर सेंटरशी संपर्क साधावा, असे आवाहन तहसीलदार विजय साळवे यांनी केले.