ग्राम पार्डी टकमोर येथे आधुनिक शेती तंत्रज्ञानाबाबत जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 15, 2021 04:35 AM2021-02-15T04:35:28+5:302021-02-15T04:35:28+5:30
कृषी विज्ञान केंद्राकडून पार्डी टकमोर येथील पारेश्वर संस्थान सभागृहात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रतिष्ठित नागरिक मधुकरराव उगले, तर प्रमुख पाहुणे ...
कृषी विज्ञान केंद्राकडून पार्डी टकमोर येथील पारेश्वर संस्थान सभागृहात आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्रतिष्ठित नागरिक मधुकरराव उगले, तर प्रमुख पाहुणे म्हणून तंटामुक्ती अध्यक्ष राजूभाऊ चौधरी उपस्थित होते. कृषी विज्ञान केंद्राकडून प्रमुख मार्गदर्शक म्हणून वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. आर. एल. काळे, दत्तक गाव समन्वयक एस. के. देशमुख, शास्त्रज्ञ टी. एस. देशमुख, डॉ. डी. एल. रामटेके व शुभांगी वाटाणे यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती. प्रास्ताविकात एस. के. देशमुख यांनी पुढील तीन वर्षे दत्तक गावात कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून तंत्रज्ञान पोहोचविण्यात येणार असल्याचे सांगितले. डॉ. आर. एल काळे यांनी कृषी विज्ञान केंद्राच्या माध्यमातून उत्तम शेती व प्रयोगशिलता जोपासण्यासाठी शेतकऱ्यांच्या गरजेनुरूप प्रशिक्षण प्रात्यक्षिक व चाचण्या घेणार असल्याचे सांगितले. तांत्रिक मार्गदर्शनात शास्त्रज्ञ टी. एस.देशमुख, डॉ. डी. एल. रामटेके, शुभांगी वाटाणे यांनी आपल्या विभागाशी निगडित उपलब्ध तंत्रज्ञान व पुढील वाटचाल या विषयी सखोल उद्बोधन केले. राजूभाऊ चौधरी यांनी कृषी विज्ञान केंद्राला संपूर्ण सहकार्य करण्याची ग्वाही दिली. मधुकरराव उगले यांनी स्वत:च्या अनुभवातून प्रशिक्षणाचे फायदे व गरजेनुरूप ज्ञानाचा लाभ घेऊन उद्योगशिलता जोपासावी, असे आवाहन केले. कृषी सहायक दुगाने यांनीही कृषी विभाग योजनांची माहिती दिली. गावात शिवार फेरी घेतल्यानंतर उत्तम श्रावण कांबळे, संजय गायकवाड यांच्या शेतातील कुक्कुट पालन युनिटला भेट देण्यात आली. सूत्रसंचालन एस.के. देशमुख, तर आभार प्रदर्शन दिनेश चौधरी यांनी केले.