चिमुकल्यांची प्लास्टीक पिशव्या न वापरण्याबाबत जनजागृती !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 27, 2019 12:26 PM2019-09-27T12:26:22+5:302019-09-27T12:26:27+5:30
राष्ट्रीय हरितसेनेचे शिक्षक अभिजीत मुकुंदराव जोशी यांच्या मार्गदर्शनात व निसर्ग इकोक्लबच्या विद्यार्थ्यांच्या सहकार्यांने जनजागृती केली .
वाशिम: स्थानिक एस एम सी इंग्लिश स्कूल वाशिमच्या राष्ट्रीय हरितसेनेच्या चिमुकल्यांनी जागतिक हरित ग्राहकदिनी बाजारात फिरून प्लास्टिक पिशव्या न वापरण्याबाबत ग्राहकांसह दुकानदारांमध्ये जनजागृती केली यावेळी विद्यार्थ्यांनी आपल्या गोड आवाजात प्लॉस्टिकमुळे होणार्या हानीबाबत प्राचार्य मीना उबगडे व राष्ट्रीय हरितसेनेचे शिक्षक अभिजीत मुकुंदराव जोशी यांच्या मार्गदर्शनात व निसर्ग इकोक्लबच्या विद्यार्थ्यांच्या सहकार्यांने जनजागृती केली . २८ सप्टेंबर हा दिवस जागतिक हरित ग्राहक दिन म्हणुन संबोधला जातो . हरितग्राहक ही संकल्पना पाश्चिमात्य देशात रूढ झाली असली तरी भारतामध्ये ती नविन नाही . गेल्या काहि वर्षांमध्ये ग्राहकवादाची वाढ झपाट्याने झाली आहे . गरजेचा विचार न करता केली जाणारी खरेदी अशी ग्राहकवादाची सोपी व्याख्या करता येईल. शॉपींगला जाने हे त्याचे उत्तम उदाहरण आहे. वाढत्या ग्राहकवादामुळे आपल्याला बर्याच समस्यांना तोंड द्यावे लागत आहे. त्याचा विचार होने गरजेचे आहे .वाढता घनकचरा व त्याचे व्यवस्थापन ,उत्पादन प्रक्रियेतुन होणारे प्रदूषण यावर मार्गदर्शन करीत राष्ट्रीय हरितसेनेच्या वतीने वाशिम शहरात कापडी पिशव्यांचे वाटप करण्यात आले . ग्राहकांनी प्लास्टीकच्या पिशव्यांचा वापर न करता कापडी पिशव्यांचा वापर करण्याचा आग्रह करण्यात आला . या चिमुकल्यांच्या आवाहानाने शहरातील चौक गजबजुन गेला होता . हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय हरितसेनेचे चिमुकले गौरव भाकरे , ओम बोरकर, प्रसन्नजीत कांबळे , प्रियंका शिरसाठ , मेघना शर्मा , आचल गायकवाड , दिशा दायमा , ऋतुजा पंडित , विशाल वानखेडे , ऋचा हिवरकर , सुमीत चोंडकर, शुभम मोहळे , जान्वी वानरे, सर्वज्ञ आरू , अनुष्का कावरखे , ओम नागुलकर , रेणुका जांगीड , विवेक बोरकर, प्रणय राठोड ,वैष्णवी ईढोळे ,साहिल राउत ,हरिश तोतला यांनी अथक परिश्रम घेतले .कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय हरितसेनेचे शिक्षक अभिजीत मुकुंदराव जोशी यांनी केले.