गूडमाँर्निग पथकामार्फत जनजागृती मोहीम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:41 AM2021-03-26T04:41:54+5:302021-03-26T04:41:54+5:30
जिल्हास्तरीय गुडमॉर्निंग पथकातील राम श्रृंगारे, रवि पडघान, प्रफुल्ल काळे, शंकर आंबेकर अमित घुले, अभिजित दुधाटे या अधिकारी कर्मचाºयांनी गुरुवार ...
जिल्हास्तरीय गुडमॉर्निंग पथकातील राम श्रृंगारे, रवि पडघान, प्रफुल्ल काळे, शंकर आंबेकर अमित घुले, अभिजित दुधाटे या अधिकारी कर्मचाºयांनी गुरुवार २५ फेब्रुवारी रोजी, मंगरूळपीर तालुक्यातील धानोरा, सनगाव, शिवणी द, पिंपळगाव ई, आसेगाव, कुंभी, लही, वसंतवाडी आणि वाशीम तालुक्यातील वारा देपूळ येथे हागणदारीमूक्त गाव मोहीमे संदर्भात जनजागृती करण्यात आली. यााच दरम्यान उघडयावर शौचास जाताना आढळलेल्या मंगरूळपीर तालुक्यातील २१, वाशिम तालुक्यातील ७, कारंजा तालुक्यातील ३२, मानोरा तालुक्यातील ३७ लोकांना समज देऊन सोडून देण्यात आले. शासनामार्फत स्थापन करण्यात येत असलेल्या निगरानी समितीबाबत देपूळ येथे माहिती देण्यात आली. शासनाने उघड्यावरील शौचवारी थांबविण्यासाठी निगराणी समिती स्थापन केली आहे. त्यात देपूळ ग्राम पंचायत सरपंच ज्योती दिपक सोनोने, उपसरपंच संजय गंगावणे, यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मागील ६ महिन्यांपूर्वी उत्कृ ष्ट कार्य केले.