‘पर्यावरण पुरक’ गणेशोत्सव साजरा करण्यासाठी हरित सेनेच्या विद्यार्थ्यांची जनजागृती!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2018 03:06 PM2018-09-11T15:06:36+5:302018-09-11T15:07:33+5:30

वाशीम: स्थानिक एस.एम.सी.इंग्लिश स्कूल ,वाशीमच्या राष्ट्रीय हरीतसेनेच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण पुरक गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन करीत याबाबत जनजागृती करीत आहेत.

awareness to celebrate 'Environmental Ganesh Festival! | ‘पर्यावरण पुरक’ गणेशोत्सव साजरा करण्यासाठी हरित सेनेच्या विद्यार्थ्यांची जनजागृती!

‘पर्यावरण पुरक’ गणेशोत्सव साजरा करण्यासाठी हरित सेनेच्या विद्यार्थ्यांची जनजागृती!

Next
ठळक मुद्दे यंदाचा गणेशोत्सव पर्यावरण पूरक साजरा करण्याचे आवाहन लोकांना केले जात आहे.एक गांव एक गणपती ही संकल्पना राबविणे इत्यादि बाबींसाठी लोकांना भावनिक आवाहन केले  जात आहे.

वाशीम: स्थानिक एस.एम.सी.इंग्लिश स्कूल ,वाशीमच्या राष्ट्रीय हरीतसेनेच्या विद्यार्थ्यांनी पर्यावरण पुरक गणेशोत्सव साजरा करावा असे आवाहन करीत याबाबत जनजागृती करीत आहेत. पर्यावरणपूरक गणेशोत्सवाचे फायदे व नुकसानाबाबत नागरिकांना माहिती देण्यात येत आहे.
गणेशोत्सव  आला म्हणजे आबाल वृद्धांना चाहूल लागते ती लाडक्या गणेशाच्या आगमनाच्या तयारीची . बच्चे कंपनीला तर त्यात विशेष रस पण त्यासाठी प्लास्टर  आॅफ पॅरीस ,थर्माकालच्या वाढत्या वापराने नदया व तलाव प्रदूषित होत आहेत .या सर्व बाबीचा विचार करुन स्थानीक एस.एम.सी.इंग्लिश स्कूल ,वाशीमच्या राष्ट्रीय हरीतसेनेच्या चिमुकल्यांनी राष्ट्रीय हरीत सेनेचे  शिक्षक अभिजीत मुकुंदराव जोशी व प्राचार्य मीना उबगडे तसेच शाळेतील शिक्षिका  भारती गटलेवार यांच्या मार्गदर्शनात शाडूमातीच्या गणपती निर्माण करण्याची कार्यशाळा घेतली. तसेच यंदाचा गणेशोत्सव पर्यावरण पूरक साजरा करण्याचे आवाहन लोकांना केले जात आहे. त्यात प्लास्टर आॅफ पॅरीस ऐवजी शाडुची गणेश मुर्ती वापरणे  किंवा तयार करणे , शाडू सहजतेने उपलब्ध नसल्यास पेपर किंवा पेपर मँशचा गणपती तयार करणे ,मुतीर्साठी रासायनीक रंगाऐवजी नैसर्गिक रंग वापरणे , सजावटीसाठी प्लास्टिक ,थर्माकॉल ऐवजी कागदाचा लगदा ,कापड ,लाकुड वापरणे ,मुर्तीचीे नदी ऐवजी हौद किंवा टाक्यामध्ये विसर्जन करणे, .निर्माल्याचे नदीत विसर्जन न करता त्याचे कंपोस्ट खतात रूपातर करणे ,ध्वनीक्षेपकाचा आवश्यक तेवढा व कमी प्रमाणात वापर करणे , शक्य तेथे एक गांव एक गणपती ही संकल्पना राबविणे इत्यादि बाबींसाठी लोकांना भावनिक आवाहन केले  जात आहे. सदर उपक्रमला हरीत सेनेचे विद्यार्थी विवेक बोरकर , सर्वेज्ञ आरू , ओम नागुलकर , नेहा वानखेडे , आरती वाझुळकर , रिझा हुसेन , श्रद्धा धुत , नेहिका गुप्ता , यश शिंदे , अनुष्का कावरखे , यश मावस , खुशी चौधरी , वजीरा खंडारे , पौर्णिमा डोंगरे , स्वरूपा सुरूशे , आर्या मालस ,पिया सरवदे यांचे मोलाचे सहकार्य लाभत आहे.
 
शाळेत तयार केले निर्माल्य कलश
उल्लेखनीय बाब म्हणजे राष्ट्रीय हरीतसेनेच्या चिमुकल्यांनी राष्ट्रीय हरीतसेनेचे शिक्षक अभिजीत मुकुंदराव जोशी यांच्या मार्गदर्शनात  शाळेमध्ये निर्माल्य कलश तयार केला असुन शाळेतील विद्यार्थींच्या घरचे व परिसरातील निर्माल्य या कलशात एकत्रीत करुन याचे कंपोस्ट खतात रुंपातर करून शाळेच्या परीसरातील रोपवाटीकेसाठी याचा वापर करण्यात येणार आहे .

Web Title: awareness to celebrate 'Environmental Ganesh Festival!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.