व्यसनविरोधी रॅली काढून केली जनजागृती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 31, 2018 03:00 PM2018-12-31T15:00:51+5:302018-12-31T15:01:17+5:30

वाशिम : समाजातील व्यसनाधिनता हद्दपार व्हावी, या उद्देशाने अंधश्रद्धा निर्मुलन समितीने व्यसनविरोधी पंधरवडा अभियान हाती घेतला असून त्याअनुषंगाने ३१ डिसेंबरला पाटणी चौक येथे  व्यसनविरोधी रॅली काढून जनजागृती केली व या पंधरवडयाचा समारोप करण्यात आला.

Awareness Rally for public awareness in Washim | व्यसनविरोधी रॅली काढून केली जनजागृती

व्यसनविरोधी रॅली काढून केली जनजागृती

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : समाजातील व्यसनाधिनता हद्दपार व्हावी, या उद्देशाने अंधश्रद्धा निर्मुलन समितीने व्यसनविरोधी पंधरवडा अभियान हाती घेतला असून त्याअनुषंगाने ३१ डिसेंबरला पाटणी चौक येथे  व्यसनविरोधी रॅली काढून जनजागृती केली व या पंधरवडयाचा समारोप करण्यात आला. या पंधरवडयात व्यसनांच्या दुष्परिणामांबाबत विविध उपक्रमांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली. ३१ डिसेंबरला मावळत्या वर्षाला निरोप आणि नवीन वषार्चे स्वागत करण्याच्या नावाखाली अनेकजण मद्य प्राशन करून धुडगुस घालतात. मद्यधुंद अवस्थेत वाहने चालविली जातात. यामुळे अपघात घडून अनेकांचा मृत्यू झाल्याच्या घटनाही यापुर्वी घडलेल्या आहेत. त्यामुळे हे टाळण्यासाठी वाशिम जिल्ह्यातील शाळा व महाविद्यालयात व्यसनविरोधी मेळावे घेवून ‘अनिंस’ने जनजागृती केली. त्याचाच एक भाग म्हणून ३१ डिसेंबरला वाशिम शहरात दारूच्या प्रतिकात्मक बाटलीला महिलांच्या हस्ते चपलांचा हार घालून रॅली काढली आलीे. यामध्ये शाळा, महाविद्यालयाचे विद्यार्थी, नागरिक सहभागी झाले होते. यावेळी  महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पी.एस. खंदारे, प्रा. यू.एस. जमधाडे, प्रा. ए.पी. राऊत, प्रा. ए.टी. वाघ, पी.एन. संधानी, डॉ. रामकृष्ण कालापाड, डॉ. विक्रम चौधरी, राजू दारोकार, प्रा. सुभाष अंभोरे, प्रा. हरीदास बनसोड, विनोद तायडे, गजानन धामणे, दिनकर बोडखे, प्रा. ऊन्मेश घुगे, अ‍ॅड. दिपाली सांबर आदिंनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रयत्न केलेत.

Web Title: Awareness Rally for public awareness in Washim

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम