विद्यार्थ्यांकडून रस्ता सुरक्षेची जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2021 05:17 AM2021-02-06T05:17:30+5:302021-02-06T05:17:30+5:30
सर्वसामान्य नागरिकांमध्ये वाहतूक, रस्ता सुरक्षा विषयी जनजागृती व्हावी, अपघातांच्या प्रमाणात घट होऊन जीवित व वित्तहानी टळावी, या हेतूने दरवर्षी ...
सर्वसामान्य नागरिकांमध्ये वाहतूक, रस्ता सुरक्षा विषयी जनजागृती व्हावी, अपघातांच्या प्रमाणात घट होऊन जीवित व वित्तहानी टळावी, या हेतूने दरवर्षी रस्ता सुरक्षा अभियान राबविण्यात येते. यावर्षी १८ जानेवारी ते १७ फेब्रुवारी या कालावधीत अभियान राबविण्यात येत आहे. त्यानुषंगाने स्व. पुष्पादेवी पाटील महाविद्यालयाच्या रासेयो व रसायनशास्त्र विभागातर्फे रस्ता सुरक्षा अभियान सवड येथे राबविण्यात आले. यावेळी सायकल, बैलगाडी, ट्रॅक्टर, ट्रॉली यावर रेडियम पट्टी लावून प्राचार्य डॉ.जे. बी. देव्हडे यांच्या मार्गदर्शनात जनजागृती करण्यात आली.
वाहन चालवत असताना नियमांचे उल्लंघन होऊ नये, निष्काळजीपणे वाहन चालविल्याने चालकासोबत प्रवाशांचा जीव कसा धोक्यात येतो, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. वाहतूक व रस्ता सुरक्षाविषयी जनजागृती करण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने पोलीस हेड कॉन्स्टेबल धनंजय ठाकरे, दिलीप पवार, दिलीप जाधव, दिगंबर वैद्य यांनी मार्गदर्शन केले. वाहतूक जनजागृती कार्यात प्रा. भोयर, प्रा. कोकाटे, डॉ. भगत, डॉ. शेळके, डॉ. बदर, डॉ. फाटक, डॉ. जाधव यांच्यासह विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला.