चित्ररथाद्वारे योजनांची जनजागृती!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2021 04:40 AM2021-03-10T04:40:49+5:302021-03-10T04:40:49+5:30
याप्रसंगी जिल्हा नियोजन अधिकारी सुनीता आंबरे, समाज कल्याणच्या सहायक आयुक्त माया केदार, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता ...
याप्रसंगी जिल्हा नियोजन अधिकारी सुनीता आंबरे, समाज कल्याणच्या सहायक आयुक्त माया केदार, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त सुनंदा बजाज, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी राजेश नागपुरे, जिल्हा माहिती अधिकारी विवेक खडसे व माहिती सहायक तानाजी घोलप यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
या चित्ररथाच्या माध्यमातून गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, माझी कन्या भाग्यश्री योजना, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, प्रमोद महाजन कौशल्य विकास अभियान, महत्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, एकात्मिक कुक्कुट विकास कार्यक्रम आदी योजनांची सचित्र माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविली जाणार आहे, तसेच चित्ररथावरील ध्वनिक्षेपकावरून मनोधैर्य योजना, प्रधानमंत्री मातृवंदना योजना, जिल्हा उद्योग केंद्र कर्ज योजना, जननी शिशु सुरक्षा योजना, मच्छीमार सहकारी संस्थांना अर्थसाहाय्य योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना, मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम, कृषी यांत्रिकीकरण उपअभियान, माझी कन्या भाग्यश्री व शुभमंगल सामूहिक विवाह योजना आदी योजनांची माहिती दिली जाणार आहे.