रिठद येथे दवंडीद्वारे जनजागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2021 04:37 AM2021-03-15T04:37:09+5:302021-03-15T04:37:09+5:30
................ हरभरा उत्पादनात घट येण्याची शक्यता उंबर्डाबाजार : रब्बी हंगामातील मुख्य पीक असलेल्या हरभरा पिकाची सोंगणी सध्या उंबर्डा बाजारसह ...
................
हरभरा उत्पादनात घट येण्याची शक्यता
उंबर्डाबाजार : रब्बी हंगामातील मुख्य पीक असलेल्या हरभरा पिकाची सोंगणी सध्या उंबर्डा बाजारसह परिसरात जोरात सुरू आहे. वातावरण बदलामुळे हरभरा उत्पादनात मोठी घट येणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे.
...............
डासांमुळे आराेग्य धाेक्यात
उंबर्डाबाजार : गावातील अनेक भागातील नाल्यांची अद्यापही साफसफाई झाली नसल्यामुळे डासांची पैदास वाढली असल्याने गावात नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. डासांच्या उत्पत्तीला आळा घालण्यासाठी गावात धूर फवारणी करण्याची मागणी ग्रामस्थांमधून पुढे येत आहे.
---------------
रस्त्यांवर खड्डे; वाहनधारक त्रस्त
वाशिम : शहरातील अंतर्गत रस्त्यांचे काही महिन्यांपूर्वी नूतनीकरण झाले; मात्र अल्पावधितच रस्ते खराब झाले आहेत. काही रस्त्यांना मोठमोठे खड्डे पडले असून, वाहनचालक त्रस्त झाले आहेत.
-------------
कोरोनाबाधित विलगीकरण केन्द्रात
उंबर्डाबाजार : येथील ३ व्यक्तींचा काेराेनाचा चाचणी अहवाल ११ मार्च रोजी पाॅझिटिव्ह आल्याने त्यांच्यासह इतर चार व्यक्तींना उपचारासाठी कारंजा येथील विलगीकरण केंद्रात पाठविण्यात आले. यावेळी ग्रामविकास अधिकारी जयकिसन आडे, पटवारी मुंडाळे, वैद्यकीय अधिकारी डाॅ. एस.आर. नांदे, पोलीस पाटील उमेश देशमुख आदी उपस्थित हाेते.
----------
किन्ही येथे पाणीपातळीत घट
वाशिम : यावर्षी पिकांच्या सिंचनासाठी पुरेसे पाणी उपलब्ध झाले. आता मात्र कूपनलिकांची पाणीपातळी हळूहळू घटत चालली आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी पाण्याचा जपून वापर करावा, असे आवाहन ग्रा.पं.कडून करण्यात आले आहे.