Ayodhya Verdict : वाशिम जिल्ह्यात शाळांना सुटी; चौकाचौकात पोलिस बंदोबस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 9, 2019 03:56 PM2019-11-09T15:56:07+5:302019-11-09T15:56:34+5:30
जिल्ह्यात कुठेही अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्था धोक्यात सापडू नये, यासाठी खबरदारी घेण्यात आली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : बहुचर्चित व बहुप्रतिक्षीत अशा अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून जाहीर निकालाच्या पृष्ठभुमीवर वाशिम जिल्ह्यात कुठेही अनुचित प्रकार घडून कायदा व सुव्यवस्था धोक्यात सापडू नये, यासाठी खबरदारी घेण्यात आली आहे. त्यानुषंगाने जिल्ह्यातील शाळांना सुटी जाहीर करून चौकाचौकात चोख पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला आहे. नागरिकांमधूनही सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे स्वागत होत असून सर्वत्र शांतता कायम असल्याचे दिसून येत आहे.
वाशिम शहर व जिल्ह्यातील काही संवेदशनशिल भागात प्रशासनाने कलम १४४ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश लागू केला आला आहे. जिल्हा पोलिस अधीक्षक वसंत परदेशी यांनी जिल्ह्यातील सर्व एसडीपीओंसह ठाणेदारांना अलर्ट राहण्याच्या सूचना दिल्या असून, ठिकठिकाणी चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. बंदोबस्ताकरिता लागणारे हेल्मेट, काठी, बॅरिकेटस आणि नळकांड्यांचीही पुरेशी व्यवस्था करण्यात आली आहे.
६२९ अधिकारी, कर्मचाºयांसह ४३९ होमगार्ड तैनात
अयोध्या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाकडून दिल्या जाणाºया निकालाच्या पृष्ठभुमीवर पोलिस प्रशासनाने जिल्हाभरात ४७ पोलिस अधिकारी, ५८२ कर्मचारी, ४३९ होमगार्ड्स, एसआरपीएफच्या ९ तुकड्या, आरसीपीचे २ पथक तैनात केले आहे.