‘आझादी का अमृत महोत्सव’ कार्यक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:46 AM2021-09-21T04:46:43+5:302021-09-21T04:46:43+5:30
सदर शिबिराच्या अध्यक्षस्थानी तालुका विधिसेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायधीश वाय.डी. कोईनकर होते. प्रमुख उपस्थितीत सहदिवाणी न्यायाधीश ...
सदर शिबिराच्या अध्यक्षस्थानी तालुका विधिसेवा समितीचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायधीश वाय.डी. कोईनकर होते. प्रमुख उपस्थितीत सहदिवाणी न्यायाधीश क स्तर एस.एन. गवळी, गटविकास अधिकारी वानखडे हे हजर होते. कायदेविषयक जनजागृती शिबिरामध्ये डी.व्ही. महाजन मार्गदर्शन करताना, प्रत्येकाने कोर्टात केस दाखल करण्यापूर्वी समझोता करणे महत्त्वाचे ठरते असे म्हटले, विधिज्ञ एन.व्ही. देशमुख यांनी जेलमध्ये असलेल्यांवर त्यांनी मार्गदर्शन केले. अन्य विषयांवर ए.पी. सहातोंडे, सचिव विधिज्ञ मंडळ रिसोड यांची भाषणे झाली. यावेळी सहदिवाणी न्यायाधीश क स्तर एस.एन. गवळी यांच्याही कायदेविषयक शिबिराबद्दल भाषण झाले. कार्यक्रमाचे संचालन डी.व्ही. महाजन यांनी केले. आभारप्रदर्शन, अध्यक्ष वकील संघ रिसोड एस.पी. भारती यांनी केले. सदर कार्यक्रमामध्ये विधिज्ञ बोरखेडी येथील जि.प. शिक्षक, ग्रामसेवक, पोलीस पाटील, सरपंच, उपसरपंच, तंटामुक्ती अध्यक्ष, अंगणवाडीसेविका, गावातील गावकरी मंडळी, पोलीस कर्मचारी, न्यायालयातील कर्मचारी वृंद हजर होते.