बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 17, 2021 04:40 AM2021-04-17T04:40:28+5:302021-04-17T04:40:28+5:30
डॉ.बाबासाहेब आंबेडकर पदवीधर संघटनेचे अध्यक्ष राजकुमार पडघान, संध्या पडघान, संजिवनी पडघान, लक्ष्मीबाई पडघान, आकाश पडघान, संतोष पडघान, कनिष्क पडघान, ...
डॉ.बाबासाहेब आंबेडकर पदवीधर संघटनेचे अध्यक्ष राजकुमार पडघान, संध्या पडघान, संजिवनी पडघान, लक्ष्मीबाई पडघान, आकाश पडघान, संतोष पडघान, कनिष्क पडघान, तन्वी पडघान, देवा पडघान, किरण खंडारे, देवेंद्र खंडारे, विशाल खंडारे, जयदीप जाधव, केशरबाई खिल्लारे, किसन खंडारे, नाना खंडारे, बंडू पडघान, मुरलीधर पट्टेबहादूर यांच्यासह अनेकांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केले.
००
वाशिम : केकतउमरा येथील राजा प्रसेनजीत अल्पसंख्याक शिक्षण बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने घरातच जयंती साजरी केली. संस्थेचे अध्यक्ष प्रवीण पट्टेबहादूर यांनी विचार मांडले. या कार्यक्रमाला नेहरू युवा केंद्र वाशिम तालुका समन्वयक प्रदीप पट्टेबहादूर, वर्षाबाई पट्टेबहादूर, मनिषा पट्टेबहादूर, दीपक पट्टेबहादूर, भीमराव पट्टेबहादूर उपस्थित होते. कार्यक्रमांचे सूत्रसंचालन प्रदीप पट्टेबहादूर यांनी केले, तर आभार पवन हरीमकर यांनी मानले.
००००
वाशिम : राजा प्रसेनजीत अल्पसंख्यांक शिक्षण संस्था व नेहरू युवा बहुउद्देशीय मंडळ केकतउमरा द्वारा आयोजित महात्मा फुले व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त जिल्हास्तरीय ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेत जिल्ह्यातील अनेक स्पर्धकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदविला व महामानव डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त वकृत्व सादर करून अभिवादन केले. या सदर स्पर्धेचा निकाल १७ एप्रिल रोजी प्रमुख मार्गदर्शक यांनी जाहीर केला आहे. यामध्ये प्रथम क्रमांक दीक्षा राऊत, तर द्वितीय क्रमांक नेहा वैद्य, तर तृतीय क्रमांक रितेश आसोले, चतुर्थ क्रमांक राधिका मानवतकर, पाचवा क्रमांक प्रणव वाकुडकर यांनी पटकाविला आहे. ऑनलाइन वक्तृत्व स्पर्धेतील या सर्व विजयी व सहभागी स्पर्धकांचे संस्थेचे अध्यक्ष प्रवीण पट्टेबहादूर यांनी स्वागत केले. सदर स्पर्धेचे बक्षीस वितरण कोरोना काळात शासनाच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करून लवकरच कळविले जाईल, अशी माहिती नेहरू युवा केंद्र वाशिम तालुका समन्वयक तथा नेहरू युवा मंडळ अध्यक्ष प्रदीप पट्टेबहादूर यांनी प्रसिद्धी पत्रकातून कळविली आहे.
००