बाळ वारंवार डायपर ओले करतेय; तातडीने डॉक्टरांना दाखवा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 23, 2021 04:25 AM2021-07-23T04:25:32+5:302021-07-23T04:25:32+5:30
काही बालकांमध्ये जन्मत:च टाइप वन मधुमेह असण्याची शक्यता नाकारता येत नाही. रात्रीच्या वेळी जास्त तहान लागणे, पाणी जास्त पिणे, ...
काही बालकांमध्ये जन्मत:च टाइप वन मधुमेह असण्याची शक्यता नाकारता येत नाही. रात्रीच्या वेळी जास्त तहान लागणे, पाणी जास्त पिणे, वारंवार लघवीला जाणे अशी लक्षणे असलेल्या बालकांना हा आजार जडण्याची दाट शक्यता असते.
००००००००००
काय आहेत लक्षणे
टाइप वन मधुमेहात जास्त तहान लागते, वारंवार लघवीला जावे लागते, उलट्या होणे, मंदपणा जाणवणे, खूप झोप येणे ही लक्षणे आढळतात. अशी लक्षणे आढळून आल्यास रक्तातील साखरेची पातळी तपासणारी चाचणी करावी. एखाद्या लहान मुलाला टाइप वन मधुमेह आहे, हे निदान झाल्यावर पुढील उपचार केले जातात. नियमित देखरेख आणि व्यायाम यांना नियंत्रित आहाराची जोड दिली तरच त्याचे नियंत्रण होऊ शकते.
०००००
आई-वडिलांना मधुमेह असेल तर...
आई-वडिलांना किंवा यांपैकी एखाद्याला मधुमेह असेल तर मुलालादेखील मधुमेह होण्याची शक्यता नाकारता येत नाही. वारंवार लघवीला जाणे, जास्त भूक लागणे, चिडचिडेपणा जास्त करीत असेल तर तपासणी करणे गरजेचे आहे.
०००
बाळांची वेळीच तपासणी करा !
बाळाला जास्त तहान लागणे, जास्त पाणी पिणे आणि वारंवार लघवीला जाणे अशी लक्षणे आढळून आली तर रक्तातील साखरेची पातळी तपासणारी चाचणी करावी, अशा लक्षणाची बालके तपासणीसाठी येतात.
- डॉ. विजय कानडे
बालरोगतज्ज्ञ
०००००००००
लहान मुलांमध्येही टाइप वन मधुमेह आढळून येतो. नियमित देखरेख, उपचार आणि नियंत्रित आहार यांमुळे हा आजार नियंत्रणात ठेवता येऊ शकतो. पालकांनी अधिक दक्ष राहणे गरजेचे आहे.
- डॉ. प्रवीण वानखडे
बालरोगतज्ज्ञ