दप्तरमुक्त शनिवार उपक्रम
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:37 AM2021-02-07T04:37:52+5:302021-02-07T04:37:52+5:30
त्यासाठी विविध प्रकल्प विद्यार्थ्यांकडून करून घेतले जातात. त्यातील एक म्हणजे विद्यार्थ्यांची बालसभा हाेय. बालसभेत कलेचा वापर करून स्वयंअध्ययन, ...
त्यासाठी विविध प्रकल्प विद्यार्थ्यांकडून करून घेतले जातात. त्यातील एक म्हणजे विद्यार्थ्यांची बालसभा हाेय.
बालसभेत कलेचा वापर करून स्वयंअध्ययन, अध्यापन अंतर्गत दप्तरमुक्त शनिवार हा एक उपक्रम राबविला जातो .
शनिवारी आठवड्याभरात शिकविल्या गेलेल्या भागावर उजळणी म्हणून चाचणी घेण्यात येते. त्यानंतर बालसभेचे आयोजन केले जाते. त्यामध्ये सोमवारी अभ्यासक्रमामधील कुठलाही एक भाग घेऊन शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी अभ्यास करतात व तो टॉपिक शनिवारी घेण्यात येणाऱ्या बालसभेत व्यासपीठावरून सर्वांसमोर सादर करतात. सादरीकरणासाठी अभिनय, वेशभूषा ,साहित्य वापरण्याची मुभा विद्यार्थ्यांना दिली जाते. काही विद्यार्थी हिंदी, मराठी, इंग्रजीमधील पाठाचे नाट्यात रूपांतर करून अभिनयातून सादरीकरण करतात स्क्रिप्ट स्वतः लिहून शिक्षकाकडून फक्त मार्गदर्शन घेतात हे विशेष.
याचा फायदा विद्यार्थ्याचा त्या टॉपिकचा अभ्यास व्यवस्थित होतो. त्यांचा आत्मविश्वास वाढतो, अभ्यासात मागे राहिलेले विद्यार्थी या प्रयोगामुळे अभिनयाच्या माध्यमातून प्रगट व्हायला लागतात. शिक्षकांची भीती व शिकण्याचा ताण दूर होतो .त्यामुळे विद्यार्थी व शिक्षक यांचे जिव्हाळ्याचे संबंध तयार होतात. आपल्यालासुद्धा शाळेत किंमत आहे, आपणसुद्धा काहीतरी करू शकतो ही भावना वाढीस लागून अभ्यासात मागे पडलेले विद्यार्थी नव्या जोमाने अभ्यासाला लागतात. त्यामुळे विद्यार्थी शनिवारच्या बालसभेची वाट पाहतात, अशी माहिती वसंतराव विद्यालयाचे मुख्याध्यापक योगेश देशमुख यांनी दिली. या उपक्रमाचे सर्वत्र कौतुक केल्या जात आहे.