मागासवर्गीय विज कर्मचारी संघटना आक्रमक ; वाशिम येथे साखळी उपोषण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2019 02:23 PM2019-06-10T14:23:03+5:302019-06-10T14:23:21+5:30
कर्मचारी संघटनेकडून सोमवार १० जून रोजीपासून महावितरणच्या वाशिम येथील मंडळ कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : महावितरण कंपनी मागासवर्गीय कर्मचाºयांवर अन्यायकारक कारवाई करीत असल्याचा आरोप मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटनेकडून करण्यात येत असून, गेल्या काही महिन्यांत चौकशीविनाच जिल्ह्यातील दोन कर्मचाºयांना निलंबित, तर एका कर्मचाºयाला बडतर्फ करण्यात आले. या अन्यायकारक धोरणामुळे मागासवर्गीय विद्युत कर्मचारी संघटना आकमक झाली असून, कर्मचाºयांवरील कारवाईचा निषेध करण्यासह निलंबन, बडतर्फीच्चा निर्णय मागे घेण्यााच्या मागणीसाठी कर्मचारी संघटनेकडून सोमवार १० जून रोजीपासून महावितरणच्या वाशिम येथील मंडळ कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू करण्यात आले आहे.
महावितरण कंपनी मधील मागासवर्गीय कर्मचाºयांवर सुडबुद्धीने बेकायदेशीर रित्या निलंबनाची, बडतर्फीची कारवाई करण्यासह मानसिक त्रास देण्याचा प्रकार वाशिम जिल्ह्यात सुरू असल्याचा आरोप मागासवर्गीय कर्मचारी संघटनेकडून होत आहे. यामुळे कर्मचाºयांत दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचा कंपनीच्या कामकाजावरही विपरीत परिणाम झाला. गेल्या काही महिन्यांपूर्वी वाशिम जिल्ह्यातील दोन कर्मचाºयांना निलंबित, तर एका कर्मचाºयाला बडतर्फ करण्याची कारवाई करण्यात आली आहे. ही कारवाई करताना महावितरणच्या कार्यकारी अभियंत्यांनी कोणतीही चौकशी केली नाही. त्यामुळे ही कारवाई अन्यायकारक असल्याचा आरोप संघटनेकडून होत आहे. या अन्यायकारक कारवाईमुळे कर्मचाºयांत संतापाची लाट उसळली असून, कारवाईचा निषेध करण्यासह ही कारवाई मागे घेण्याची मागणी संघटनेकडून होत आहे. यासाठी संघटनेच्यावतीने ५ मे रोजी कार्यकारी अभियंत्यांना निवेदन सादर करून कारवाईचा निषेध करण्यासह आंदोलनाचा इशारा देण्यात आला. त्यानुसार १० जूनपासून महावितरणच्या वाशिम मंडळ कार्यालयासमोर साखळी उपोषण सुरू करण्यात आले असून, मागासवर्गीय कर्मचाºयांवर अन्यायकारक कारवाई करणाºया कार्यकारी अभियंत्यांना तात्काळ निलंबित करावे, अशी मागणी मागासवर्गीय विद्युुत कर्मचारी संघटनेच्यावतीने करण्यात आली आहे. या साखळी उपोषणात वाशिम मंडळ अध्यक्ष एस. सी. भगत, मंडळ सचिव संतोष इंगोले,मंडळ सहसचिव प्रशांत भगत,विभागीय अध्यक्ष किसन पवार,विभागीय सचिव महेंद्र मनवर,विभागीय सहसचिव दिनेश भगत,वसंत हाके,दिनेश राठोड, रुपाली भगत, वंदना अघम, हर्षदा गाडेकर,आरती धुर्वे, पी. एस वार्डेकर,कल्याणी वगारे आदिंनी सहभाग घेतला आहे.