निर्ढावलेल्या पोलीस अधिका-यांवर कारवाईचा बडगा!

By Admin | Published: August 12, 2015 12:40 AM2015-08-12T00:40:53+5:302015-08-12T00:40:53+5:30

एसपींच्या निर्देशावरून एलसीबीच्या पीआयची बदली; पथक गठीत.

Badha's action against the police officers ordered! | निर्ढावलेल्या पोलीस अधिका-यांवर कारवाईचा बडगा!

निर्ढावलेल्या पोलीस अधिका-यांवर कारवाईचा बडगा!

googlenewsNext

वाशिम : गेल्या १५ दिवसांपासून जिल्हा पोलिस अधीक्षकांना अंधारात ठेवत छुप्या मार्गाने अवैध धंदे सुरू झाल्याप्रकरणी चोर पावलांनी अवैध धंद्यांना एन्ट्री, या मथळ्याखाली लोकमतने १0 ऑगस्ट रोजी प्रकाशित केलेल्या वृत्ताची पोलिस अधिक्षक विनिता साहु यांनी दखल घेतली. दरम्यान, काही पोलिस अधिकार्‍यांच्या बदल्या करून गुन्हेगारांच्या शोधकामी दोन पथके जिल्हाबाहेर रवाना केल्याची माहिती सूत्रांनी दिली. जिल्ह्यात सुरुवातीच्या काळात पोलिस अधिक्षक विनिता साहु यांनी जुगारअड्डे, पत्त्यांचे क्लब यासह अनेक अवैध धंदे बंद करण्याच्या सुचना दिल्या. सुरुवातीला हे धंदे बंदही करण्यात आले. तथापी, बंद झालेले अवैध धंदे सुरू करण्यासाठी कोणताही धोका नाही, अशी खात्री पोलिस यंत्रणेतीलच काही अधिकार्‍यांनी अवैध व्यावसायिकांना करुन दिली. यामुळे अवैध धंद्यांचे चोरपावलांनी पुनरागमन होऊ लागले.याबाबत लोकमतने वृत्त प्रकाशित करताच, पोलिस अधिक्षक साहु यांनी गुन्हेगारांच्या शोधकामासाठी दोन पथके रवाना केली. यामधील एक पथक हिंगोली, परभणी, नांदेड, परळी वैजनाथ या परिसरात पाठविले आहे.

Web Title: Badha's action against the police officers ordered!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.