वाशिम तालुका ‘खविसं’च्या सर्व संचालकांचे जामीन अर्ज फेटाळले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 11, 2019 02:51 PM2019-01-11T14:51:45+5:302019-01-11T14:51:51+5:30
वाशिम : शेतमाल गैरव्यवहारप्रकरणी गुन्हे दाखल असलेल्या तथा अद्याप फरार असलेल्या १३ संचालकांच्या अटकपूर्व जामिनावर जिल्हा व सत्र न्यायालय शुक्रवार, ११ जानेवारीला सुनावणी झाली असून, सर्व संचालकांचे अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात आले.
लोकमत न्यूज नेटवर्क

वाशिम तालुका खरेदी-विक्री संघाच्या व्यवस्थापकांसह १५ संचालकांनी शेतमाल खरेदी-विक्री प्रकरणात नियमबाह्य प्रक्रिया राबवून शेतकरी व शासनाची १ कोटी ३८ लाख २५ हजार ९८४ रुपयांनी फसवणूक केल्याप्रकरणी संबंधितांवर १७ डिसेंबरला विविध कलमांन्वये गुन्हे दाखल केले. दरम्यान, ‘खविसं’चे अध्यक्ष वामनराव महाले यांच्यासह संचालक विनोद पट्टेबहादूर आणि रुपेश वºहाडे अशा तिघांना पोलिसांनी अटक केली; परंतू अन्य १३ जण अद्याप फरार असून त्यांनी अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी न्यायालयाकडे अर्ज केला होता. या अर्जावरील सुनावणी ११ जानेवारी रोजी झाली असून, सर्व संचालकांचे जामीन अर्ज फेटाळण्यात आले आहेत.