परराज्यातून येणाऱ्या बियाण्यांवर प्रतिबंध!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2019 02:07 PM2019-05-08T14:07:48+5:302019-05-08T14:07:55+5:30

वाशिम : निकृष्ट व भेसळीच्या बियाण्यातून शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये म्हणून महाबीजने यंदाच्या हंगामात बिजोत्पादन प्रकल्पात परराज्यातील कंपन्यांच्या बियाणे वितरणावर नियंत्रण आणले आहे.

Ban on the seeds coming from the other state! | परराज्यातून येणाऱ्या बियाण्यांवर प्रतिबंध!

परराज्यातून येणाऱ्या बियाण्यांवर प्रतिबंध!

Next

 लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : निकृष्ट व भेसळीच्या बियाण्यातून शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये म्हणून महाबीजने यंदाच्या हंगामात बिजोत्पादन प्रकल्पात परराज्यातील कंपन्यांच्या बियाणे वितरणावर नियंत्रण आणले आहे. त्यातच बिजोत्पादनातंर्गत उत्पादन क्षमता वाढीसाठी जुन्या वाणांचे प्रमाण कमी करून नव्या वाणांवर भर देण्यात येणार असून, प्रयोगशाळेत सर्व निकषावर यशस्वी ठरलेल्या बियाण्यांचे शेतकºयांना वितरण करण्यात येणार आहे.
जिल्ह्यात जवळपास १५ हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर महाबीजकडून बिजोत्पादन प्रकल्प राबविला जातो. त्यात सोयाबीनचे क्षेत्र १२ हजार १९५ हेक्टर आहे. आता यंदाच्या खरीप हंगामासाठी महाबीजने बिजोत्पादन प्रकल्पासह इतर शेतकºयांना बियाणे उपलब्ध करून देण्याची तयारी केली असून, यासाठी निर्धारित २६ हजार क्विंटलपैकी २४ हजार क्विंटल बियाणे संबंधित केंद्रावर पाठविण्यात आले आहे.
गत काही वर्षांत महाबीजच्या बियाण्यांची उगवण क्षमता कमी असल्याच्या तक्रारी झाल्या होत्या. त्याचे निरीक्षण करून यंदाच्या हंगामासाठी बीज तपासणी प्रयोगशाळेच्या अहवालावर आधारीत बियाणे महाबीजने उपलब्ध करण्याचे ठरविले आहे. त्यात प्रमाणित बियाण्यांचे अहवाल प्राप्त झाले असून, पायाभूत बियाण्यांच्या तपासणीचे अहवाल मे महिन्याच्या अखेरीस प्राप्त होणार आहेत. त्याशिवाय मागील दोन वर्षांत महाबिजकडून मार्केटिंग करण्यात आलेल्या सोयाबीनच्या वाणांत इतर वाणाचे मिश्रण असल्याचे प्रकार घडले होते. त्यात गुजरात राज्यातून बोलावलेल्या वाणांत मोठी भेसळ असल्याचे सिद्ध झाले. त्यावेळी शेतकºयांनी मागणी केलेल्या वाणाच्या पेरणीनंतर उगवलेल्या रोपात इतर वाणाच्या रोपांचे प्रमाण अधिक असल्याच्या तक्रारी महाबीजकडे प्राप्त झाल्या होत्या.
प्रत्यक्षात महाबीजच्या बिजोत्पादन प्रकल्पाव्यतीरिक्त महाबिजच्या नावे मार्केटिंग झालेल्या कंपन्यांच्या वाणात हा प्रकार आढळून आला होता. या पृष्ठभूमीवर महाबीजने यंदाच्या हंगामात महाबीजकडून उत्पादित बियाण्यांचाच अधिकाधिक वापर करताना इतर कंपन्यांच्या मार्केटिंगवर नियंत्रण आणले आहे. शेतकºयांची फसवणूक होऊन महाबीजच्या प्रतिष्ठेला बाधा पोहोचू नये म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे.

‘सीड टेस्टिंग लॅब’च्या अहवालावर भर
महाबीजने गतवर्षीच्या हंगामात बिजोत्पादन प्रकल्पांतर्गत उत्पादित केलेल्या शेतमालातून यंदा उत्कृष्ट बियाण्यांचे वितरण करण्यासाठी अकोला येथील सीड टेस्टिंग लेबॉरटरीच्या तपासणीवर सर्वाधिक भर दिला. या प्रयोगशाळेत झालेल्या तपासणीनंतरच शेतकºयांचे बियाणे खरेदी करण्यात आले आहेत. त्यामुळे खरेदी केलेले बियाणे हे अधिक उच्च दर्जाचे असणार आहे. प्रमाणित बियाण्यांची उगवण क्षमता अकोला येथील प्रयोगशाळेत, तर पायाभूत बियाण्यांची उगवण क्षमता अकोला प्रयोगशाळेसह इतर ठिकाणी करण्यात येत आहे.


गतवर्षी परराज्यातून बोलावलेल्या बियाण्यांत भेसळीचा प्रकार असल्याचे आढळून आले होते. त्यामुळे यंदा इतर राज्यातील बियाण्यांवर प्रतिबंधच राहिल. त्यातही यंदा महाबीजचे उत्पादन ९ लाख क्विंटल असल्याने बिजोत्पादन प्रकल्पासाठी इतर राज्यांच्या बियाण्यांचा आधार घेण्याची गरज भासणार नाही.
- डॉ. प्रशांत घावडे
जिल्हा व्यवस्थापक, महाबीज वाशिम

Web Title: Ban on the seeds coming from the other state!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.