श्रमदान करुन बोरव्हा लखमापुर येथे ग्रामस्थांसाठी बांधला बंधारा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 16, 2018 02:38 PM2018-05-16T14:38:59+5:302018-05-16T14:38:59+5:30
मंगरुळपीर : शहरातील चारभुजा नित्ययोग ग्रृपच्या कार्यकर्त्यांनी मंगरुळपीर तालुक्यातील बोरव्हा लखमापुर येथे १३ मे रोजी श्रमदान करुन गोट्याचा बंधारा उभा केला.
मंगरुळपीर : शहरातील चारभुजा नित्ययोग ग्रृपच्या कार्यकर्त्यांनी मंगरुळपीर तालुक्यातील बोरव्हा लखमापुर येथे १३ मे रोजी श्रमदान करुन गोट्याचा बंधारा उभा केला. ग्रामीण भागातील लोकांना येणाºया पावसाळ्याचे पाणी इतरत्र न जावु देता त्यांना पुरेसे मिळावे हाच या मागचा उद्देश येथील चारभुजा नित्ययोग गृ्रपचा आहे.
सध्या मंगरुळपीर तालुक्यात भिषण पाणी टंचाईमुळे नागरिक त्रस्त झाले आहे. लोकांना व मुक्या जनावरांना पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. हीच बाब येथील चारभुजा नित्यांगच्या कार्यकर्त्यांनी हेरुन तालुक्यातील बोरव्हा लखमापुर येथे ५० फुट लांब व ८ फुट खोल असा गोट्याचा बंधारा बांधला. येणाºया पावसाळ्यात या बंधाºयामध्ये पाण्याची साठवणुक झाली पाहिजे जेणे करुन बोरव्हा लखमापुर येथील नागरिकांना भविष्यात पाण्याची वनवा भासणार नाही हाच या मागचा उद्देश असल्याचे चारभुजा नित्ययोग गृ्रपच्या कार्यकर्त्यांनी यावेळी सांगितले. श्रमदानामध्ये आनंद राठी, नरेश बजाज, शामभाऊ भुतडा, गजेंद्र बजाज, डॉ.मनोज गट्टाणी, डॉ.दुध्धलवार, भवरीलाल बाहेती, भगवान जाखोटीया, सुरेश छल्लाणी, कृष्णा बंग, हरिष बाहेती, तुळजापुरे , अतुल सोळंके, सांकेत लांडे, यांचेसह इतरही चारभुजा नित्ययोग ग्रृपच्या कार्यकर्त्यांनी श्रमदान केले.