चिमुकले जपताहेत बंजारा समाजातील ‘भजन’ परंपरा !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2018 02:33 PM2018-06-24T14:33:04+5:302018-06-24T14:34:41+5:30
वाशिम - कारंजा तालुक्यातील पिंप्री मोडक येथे बंजारा समाजातील पूर्वीपासून चालत आलेली; परंतू मध्यंतरीच्या काळात काहीशी कमी झालेल्या ‘भजन’ परंपरेत यावर्षीपासून १० ते १५ वयोगटातील चिमुकल्या बालकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला आहे.
वाशिम - कारंजा तालुक्यातील पिंप्री मोडक येथे बंजारा समाजातील पूर्वीपासून चालत आलेली; परंतू मध्यंतरीच्या काळात काहीशी कमी झालेल्या ‘भजन’ परंपरेत यावर्षीपासून १० ते १५ वयोगटातील चिमुकल्या बालकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला आहे. गावातील सेवालाल महाराज संस्थान येथे दररोज रात्री ८ वाजता स्वयंस्फुर्तीने हजेरी लावत चिमुकली मुले भजन व आरती करतात.
पिंप्री मोडक येथे पूर्वीपासून सेवालाल महाराज संस्थानवर हजेरी लावून बंजारा भजन व आरती केली जाते. मध्यंतरीच्या काळात भजन व आरतीसाठी येणाºयांची संख्या कमी झाली होती. ही परंपरा लोप पावते की काय? अशी शंकाही व्यक्त केली जात होती. दरम्यान, यावर्षी सेवालाल महाराज जयंतीनिमित्त १० ते १५ वयोगटातील चिमुकल्यांनी पूर्वजांच्या भजन परंपरेला गतवैभव प्राप्त करून देण्याचा निर्धार करीत दररोज रात्री ८ वाजता आरती करण्याचा एकमताने निर्णय घेतला. हा निर्णय अंमलात आणत दररोज रात्री ८ वाजता न चुकता स्वत:हून सेवालाल महाराज संस्थानवर हजेरी लावत बंजारा भजन तसेच आरती घेतली जाते. गावातील अनुराग राठोड, प्रदिप आडे, मयुर जाधव, रोशन जाधव, दिपक राठोड, हर्षल जाधव, कुनाल जाधव, अमोल राठोड, सुचित आडे,अभय जाधव, रोहन राठोड, मंगेश जाधव, मनिष जाधव, आशिष जाधव, गौरव जाधव, राजेश राठोड, अजय चव्हाण, सुचित चव्हाण, आकाश चव्हाण, श्याम किरसान,नंदु आडे, सुरज राठोड, रितीक राठोड, पवन चव्हाण, तुशार चव्हाण यांच्यासह गावातील मुलांनी यासाठी स्वंयस्फुर्तीने पुढाकार घेतला आहे. तंटामुक्त गाव समिती अध्यक्ष विकास राठोड, ग्राम पंचायत सदस्य गजानन राठोड, आशिष राठोड, विलास जाधव, वसंतराव राठोड, भाष्कर राठोड, छगन जाधव, विष्णू जाधव, रामदास राठोड, निखिल राठोड, अक्षय किरसान, प्रेम राठोड आदींचे मार्गदर्शन लाभत आहे.