शंभरावर ग्रंथालय सेवकांच्या बँक खात्याचा तपशील अप्राप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2021 04:41 AM2021-03-26T04:41:56+5:302021-03-26T04:41:56+5:30

शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांमध्ये काम करणाऱ्या ग्रंथालय सेवकांना मिळणारे वेतन त्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यासाठी संबंधितांच्या बँक खात्यांचा तपशील ...

Bank account details of over a hundred library servants unavailable | शंभरावर ग्रंथालय सेवकांच्या बँक खात्याचा तपशील अप्राप्त

शंभरावर ग्रंथालय सेवकांच्या बँक खात्याचा तपशील अप्राप्त

googlenewsNext

शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांमध्ये काम करणाऱ्या ग्रंथालय सेवकांना मिळणारे वेतन त्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यासाठी संबंधितांच्या बँक खात्यांचा तपशील प्राप्त करून घेण्याबाबत ग्रंथालय संचालनालयाकडून जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयास सूचित करण्यात आले आहे. कर्मचारी बँक खाते क्रमांक, बँकेचा आयएफएससी, एमआयसीआय कोड, आधार क्रमांक, कर्मचाऱ्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक आदी माहिती ग्रंथालयांना जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाकडे सादर करावी लागणार आहे. ही माहिती संकलित झाल्यानंतर आकृतीबंधानुसार मंजूर पदावरील कार्यरत सेवकांचे वेतन थेट त्यांच्याच बँक खात्यात ईसीएस, आरटीजीएस किंवा एनईएफटीव्दारे जमा करण्याची कार्यवाही केली जाणार आहे; मात्र जिल्ह्यातील ३१२ ग्रंथालये असून शंभरावर ग्रंथालयांनी ही माहिती अद्याप सादर केलेली नाही.

.........................

कोट :

जिल्ह्यातील ग्रंथालयांनी ग्रंथालय सेवकांच्या बँक खात्यांचा सविस्त तपशील विनाविलंब सादर करण्याबाबत वारंवार आवाहन करण्यात आले; मात्र अद्याप शंभरावर ग्रंथालयांमधील ग्रंथालय सेवकांची माहिती अप्राप्त आहे.

राजेश पाटील

जिल्हा ग्रंथालय अधिकारी, वाशिम

Web Title: Bank account details of over a hundred library servants unavailable

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.