बँकांची वेळ आता सकाळी १० ते सायंकाळी ६
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2020 11:27 AM2020-07-29T11:27:35+5:302020-07-29T11:27:46+5:30
जिल्ह्यातील सर्व बँकांची वेळ सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत राहणार आहे.
वाशिम : खरीप हंगामासाठी प्रधानमंत्री पीक विमा योजनेंतर्गत विमा हप्ता सादर करण्याची अंतिम मुदत ३१ जुलै असून, कर्जदार शेतकऱ्यांसोबतच बिगर कर्जदार शेतकºयालाही बँकेत विमा हप्ता भरण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली तसेच जिल्ह्यातील सर्व बँकांची वेळ सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत राहणार आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी २८ जुलै रोजी दिली.
जिल्ह्यातील सर्व तालुक्यांतील सर्व मंडळांना ही योजना लागू आहे. तसेच अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिके घेणारे कुळाने अगर भाडेपट्ट्याने जमीन करणाºया शेतकऱ्यांसह सर्व शेतकरी प्रधानमंत्री पीक विमा योजनेसाठी पात्र आहेत. विहित प्रपत्रात नजीकच्या सामुहिक सुविधा केंद्र, महा ई-सेवा केंद्र व बँकेकडे विमा हप्ता सादर करणे आवश्यक आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील १२ हजार २४८ बिगर कर्जदार व १ लाख ३७ हजार ८७० कर्जदार शेतकरी असे एकूण १ लाख ५० हजार ११८ शेतकºयांनी प्रधानमंत्री पीक विमा योजने सहभाग घेतला आहे. या योजनेत सहभागी होण्याची अंतिम मुदत ३१ जुलै २०२० पर्यंत असून उर्वरित शेतकºयांना या योजनेत सहभागी होता यावे, यासाठी बँकेद्वारे विमा हप्ता स्वीकारण्याचा कालावधी सकाळी १० ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत केला. या कालावधीत बँकेत येणाºया कर्जदार शेतकºयांसोबतच बिगर कर्जदार शेतकºयांचाही विमा हप्ता स्वीकारण्याचे निर्देश बँकांना देण्यात आले आहेत. याबाबत कोणत्याही बँकांनी दिरंगाई केल्यास प्रशासकीय कार्यवाही करण्यात येईल, असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापनचे अध्यक्ष तथा जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी जारी केलेल्या आदेशात नमूद आहे.