बँक, पोस्ट ऑफिसमध्ये पुन्हा रांगा!

By admin | Published: November 16, 2016 02:52 AM2016-11-16T02:52:29+5:302016-11-16T02:52:29+5:30

एटीएम बंद, पेट्रोल पंपचालकांची मुजोरी कायम.

Bank, post office again! | बँक, पोस्ट ऑफिसमध्ये पुन्हा रांगा!

बँक, पोस्ट ऑफिसमध्ये पुन्हा रांगा!

Next

खामगाव, दि. १५- ५00 व १000 रुपयांच्या चलनी नोटा व्यवहारातून बंद करण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी गेल्या मंगळवारी जाहीर केला. या निर्णयाला आठ दिवस लोटल्यानंतरही शहरातील आर्थिक परिस्थिती पूर्वपदावर आली नसल्याचे चित्र असून, सोमवारी एक दिवसाच्या विश्रांतीनंतर नागरिकांनी मंगळवारी पुन्हा शहरातील विविध बँकांमध्ये नोटा बदलण्यासाठी तसेच जमा करण्यासाठी गर्दी केली. काही बँकांचे एटीएम बंद असल्याने नागरिकांना चांगलाच मनस्ताप सहन करावा लागला.
अत्यावश्यक सेवा आणि काही ठिकाणी २४ नोव्हेंबरपर्यंत ५00, १000 रुपयांच्या नोटा स्वीकारण्याची मुभा देण्यात आली आहे; मात्र बहुतांश ठिकाणी या नोटा अद्यापही स्वीकारल्या जात नाहीत. सराफा बाजारासह किराणा दुकानातही या नोटा स्वीकारण्यात येत नसल्याने, नागरिक प्रामुख्याने महिला वर्गाची चांगलीच कोंडी होत असल्याचे चित्र आहे. भाजी बाजारातही हीच परिस्थिती कायम असल्याने, व्यवहार करावे तरी कसे, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. जिल्हाधिकार्‍यांच्या समन्सनंतरही शहर आणि परिसरातील पेट्रोल पंप संचालकांच्या मुजोरीत काहीच फरक पडला नसल्याचे चित्र कायम आहे. नोटा बंदीच्या निर्णयाचा लाभ उठवित पेट्रोल पंप संचालकांनी आपला धंदा वाढविण्याचेच उद्दिष्ट समोर ठेवले. पाचशे आणि हजार रुपयांचे पेट्रोल डिझेल घेतले तरच या नोटा स्वीकारल्या. चिल्लर असल्यानंतरही अनेक ग्राहकांना नाहक पेट्रोल पंपधारकांची वेठीस धरत असल्याचे चित्र आठ दिवसांनंतरही कायमच होते. रेल्वेस्थानकावर प्रवाशांचे पैसे स्वीकारण्यात आल; मात्र या ठिकाणी चिल्लरचा खोळंबा निर्माण झाला होता. त्यामुळे प्रवाशांचे पैसे स्वीकारल्या जात असतानाही, चिल्लर नसल्याने काहीच उपयोग होत नव्हता. परिणामी, अनेक प्रवासी हतबल झाले आहेत.

Web Title: Bank, post office again!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.