दिवाळीत लोकवाहिनी ठप्प!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 18, 2017 01:50 AM2017-10-18T01:50:42+5:302017-10-18T01:51:12+5:30

वाशिम : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी)  कर्मचार्‍यांना सेवा ज्येष्ठतेनुसार सातव्या वेतन आयोगातील वे तनश्रेणीसह सेवा, सवलती, विविध भत्ते तसेच विविध प्रलंबित  मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) च्यावतीने सोमवारी मध्यरात्रीपासून बेमुदत संपाचे हत्यार उपसण्यात आले.

Bankrupt jubilant junk! | दिवाळीत लोकवाहिनी ठप्प!

दिवाळीत लोकवाहिनी ठप्प!

Next
ठळक मुद्देप्रवाशांचे हाल जिल्ह्यात एसटी कर्मचार्‍यांचा बंद शंभर टक्के यशस्वी!

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी)  कर्मचार्‍यांना सेवा ज्येष्ठतेनुसार सातव्या वेतन आयोगातील वे तनश्रेणीसह सेवा, सवलती, विविध भत्ते तसेच विविध प्रलंबित  मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक) च्यावतीने सोमवारी मध्यरात्रीपासून बेमुदत संपाचे हत्यार उ पसण्यात आले. वाशिम जिल्ह्यात या संपाला शंभर टक्के यश  मिळाले असून, प्रशासन आणि कामगारांचा संघर्ष दिवाळीत  उफाळून आल्याने प्रवाशांचे हाल होत असल्याचे दिसत आहे. 
सातवा वेतन आयोग लागू करावा, या मागणीसाठी एसटी मान्य ताप्राप्त संघटनेने हा संप पुकारला आहे. यासंबंधी मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत झालेल्या बैठकीत आयोग लागू  करण्याबाबत त्यांनी असर्मथता दर्शविली. परिणामी, मान्यताप्राप्त  संघटनेने संप करण्याचा निर्णय घेतला. एसटी कामगारांनी  राज्यभर संपाची हाक दिल्यानंतर संपाच्या तडजोडीबाबत मु ख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत मान्यताप्राप्त संघटनेच्या  शिष्टमंडळाची बैठक झाली. या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी  महामंडळातील कर्मचार्‍यांना सातवा वेतन आयोग लागू  करण्यास असर्मथता दर्शवली. त्यामुळे मध्यरात्रीपासून राज्यभर  एसटी कामगारांचा संप सुरू झाला आहे. मान्यताप्राप्त कामगार  संघटना आणि इंटक या दोन्ही प्रमुख संघटना संपात सहभागी  झाल्या आहेत. वाशिम जिल्ह्यातील ७00 हून अधिक कर्मचारी  या संपात सहभागी झाले असून, या संपामुळे एसटीच्या प्रवासाला  पसंती देणार्‍या प्रवाशांचे हाल होत आहेतच शिवाय दिवाळीच्या  उत्सवात प्रवास करणार्‍या प्रवाशांना अतोनात त्रास सहन करीत  खासगी वाहनांचा आधार घ्यावा लागत आहे. नागरिकांची  गैरसोय होऊ नये यासाठी सर्व   खासगी प्रवासी बस, स्कूल  बस, कंपन्यांच्या मालकी बस आणि मालवाहू वाहने यांना  प्रवासी वाहतुकीसाठी मान्यता दिली असली तरी, वाशिम  जिल्ह्यात अशा वाहनांचे प्रमाण कमी असल्याने विशेष करून  ग्रामीण भागांतून प्रवास करणार्‍या लोकांना यामुळे मोठा त्रास  सहन करावा लागत आहे. 
रिसोड आगारात एकूण २६५ कर्मचारी असून यापैकी २0७  कर्मचारी संपावर असल्याची माहिती आगार प्रशासनाने दिली.  कारंजा आगारात २५९ पैकी १५२, वाशिम आगारात ३२५ पैकी  २१९, मंगरुळपीर आगारात २६४ पैकी २१0 कर्मचारी संपावर  असल्याचे आगार प्रशासनाने सांगितले. जिल्ह्यातील एकूण  १११३ पैकी ७८८ कर्मचारी संपावर आहेत.

खासगी वाहनधारंकांची मनमानी..
एसटी कर्मचार्‍यांचा संप सुरू झाल्यानंतर प्रवाशांची गोची झाली  आहे. या संधीचा फायदा खासगी प्रवासी वाहतूकदारांकडून  घेण्यात येत आहे. एसटी कर्मचार्‍यांच्या संपाचा आधार घेऊन  त्यांनी मनमानी पद्धतीने प्रवासभाडे आकारण्यास सुरुवात केली  आहे. एसटी प्रवास भाड्यापेक्षाही अधिक प्रवासभाडे या  वाहनधारकांकडून करण्यात येत असल्याचे पाहायला मिळत  आहे. दरम्यान, काही खासगी वाहनधारक मात्र माणुसकीचा प्र त्यय देऊन प्रवाशांची सेवा करण्यालाही प्राधान्य देत आहेत. 

कामावर विनाशर्त परतण्याची सूचना..
मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटनेच्यावतीने पुकारलेल्या सं पामुळे प्रवाशांचे अतोनात हाल होत आहेत. या पृष्ठभूमीवर  परिवहन महामंडळाच्या सुचनेनुसार विभागीय वाहतूक  नियंत्रकांसह इतर वरिष्ठ अधिकार्‍यांच्या आदेशाने जिल्ह्यातील  प्रत्येक आगारांमध्ये संपावर गेलेल्या कर्मचार्‍यांना मंगळवार १७  ऑक्टोबर रोजीच्या ५ वाजेपर्यंत कामावर परतण्याची सूचना  देणारी नोटीस लावण्यात आली होती. या सुचनेचे पालन न  करणार्‍यांवर बडतर्फीची कारवाई केली जाणार असल्याचे  नोटीसमध्ये नमूद करण्यात आले आहे. 

आमची इच्छा नसताना आम्हाला हा संप करावा लागत आहे.  आमच्या मागण्यांबाबत तडजोड करण्याऐवजी पाच वर्षेच काय  पुढील २५ वर्षे तुम्हाला वेतन आयोग लागू होणार नाही, असे  वक्तव्य परिवहन मंत्र्यांकडून झाल्यामुळे कर्मचारी निराश झाले  आहेत. सातवा वेतन आयोग महाराष्ट्रातील कर्मचार्‍यांना लागू  झाल्यानंतर तो एसटीच्या कर्मचार्‍यांनाही शासकीय कर्मचारी  म्हणून लागू करावा, अशी आमची मागणी आहे. 
-अविनाश जहागिरदार 
प्रादेशिक सचिव, मान्यताप्राप्त एसटी कामगार संघटना अकोला.
-

Web Title: Bankrupt jubilant junk!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.