बँकाही स्विकारेनात दहा रुपयांची नाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2017 12:58 AM2017-07-18T00:58:36+5:302017-07-18T00:58:36+5:30

वाशिम : बाजारपेठेत दहा रुपयांच्या नाण्यांचे प्रमाण तुलनेने अधिक झाल्यामुळे व्यापाऱ्यांसोबतच राष्ट्रीयीकृत बँका देखील ही नाणी स्विकारायला तयार नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

Banks accept ten rupee coins | बँकाही स्विकारेनात दहा रुपयांची नाणी

बँकाही स्विकारेनात दहा रुपयांची नाणी

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : बाजारपेठेत दहा रुपयांच्या नाण्यांचे प्रमाण तुलनेने अधिक झाल्यामुळे व्यापाऱ्यांसोबतच राष्ट्रीयीकृत बँका देखील ही नाणी स्विकारायला तयार नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.
काही दिवसांपूर्वी दहा रुपयांची नाणी चलनातून बंद झाल्याच्या अफवांनी जोर धरला होता. त्यामुळे ही नाणी बाजारपेठेतील व्यावसायिकांकडून नाकारण्यात येत होती. आता बँकांकडून देखील ग्राहकांकडून नाणी स्विकारल्या जात नसल्याचे दिसून येत आहे. यासंदर्भात वाशिम येथील स्टेट बँकेचे व्यवस्थापक जॉली अब्राहम यांच्याशी चर्चा केली असता त्यांनी सांगितले, की दहा रुपयांची नाणी बंद झालेली नाहीत. मात्र, ती जमा करून घेणे सुरू केल्यास ग्राहकांकडून अधिक प्रमाणात ओघ वाढून नाहक मन:स्ताप सोसावा लागतो. त्यामुळेच नाणी स्विकारण्यास टाळाटाळ केली जात असल्याचे ते म्हणाले.

Web Title: Banks accept ten rupee coins

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.