शेलूबाजार येथील बॅकेचे आर्थिक व्यवहार ठप्प !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 6, 2019 01:24 PM2019-03-06T13:24:09+5:302019-03-06T13:24:20+5:30

शेलूबाजार ( वाशिम) : मंगरूळपीर ते शेलूबाजार या दरम्यान सुरु असलेल्या रस्ता कामात बीएसएनएलचे केबल वारंवार तुटत असल्याने याचा सर्व्हर कनेक्टीव्हीटीवर परिणाम होवून बँकेचे व्यवहार ठप्प होत आहेत.

The bank's financial affairs stopped d in Shelubazaar! | शेलूबाजार येथील बॅकेचे आर्थिक व्यवहार ठप्प !

शेलूबाजार येथील बॅकेचे आर्थिक व्यवहार ठप्प !

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
शेलूबाजार ( वाशिम) : मंगरूळपीर ते शेलूबाजार या दरम्यान सुरु असलेल्या रस्ता कामात बीएसएनएलचे केबल वारंवार तुटत असल्याने याचा सर्व्हर कनेक्टीव्हीटीवर परिणाम होवून बँकेचे व्यवहार ठप्प होत आहेत.  मागील १५ दिवसांपासून व्यवहार हे कधी सुरु तर कधी बंद राहत असल्याने. या प्रकारामुळे बँकेच्या खातेदारांसह इतर व्यवहारासाठी येथे येणाऱ्या ग्राहकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे.
 बीएसएनएलचे केबल तुटत असल्याने राष्ट्रीयकृत बँक शाखेसह ईतरही बॅकांची कनेक्टीव्हिटी बंद होवून आर्थिक व्यवहार बंद होत आहेत. बीएसएनएल सर्व्हरची तांत्रिक समस्या खातेदारांसाठी डोकेदुखी ठरत चालली आह.े राष्ट्रीयकृत बँक आणि जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या शाखाही बीएसएनएलच्या सर्व्हरशी जोडल्या आहे. स्टेट बँक, सेंट्रल बँक आदी बॅकेचे व्यवहार बंद आहे. व्यवहार बंद असल्यामुळे येथे दरदिवशी येणारे हजारांवर ग्राहक, खातेदार प्रचंड अडचणीत सापडले असून, त्यांची समस्या सोडविण्यासाठी वरिष्ठ स्तरावरुन प्रयत्न करणे गरजेचे आहे. यापुढेही कनेक्टीव्हिटीची समस्या कायम राहणार असल्याचे सांगितले जात आहे.  नव्याने तयार होणार्‍या मंगरुळपीर ते अकोला या दरम्यान रस्त्याचे काम सुरु असल्याने केबल तुटण्याचा प्रकार सुरूच राहणार असल्याचे शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे बॅकांनी स्वतंत्र व्यवस्था करुन घेणे गरजेचे आहे. मागील १५ दिवसातून बोटावर मोजण्या इतकेच दिवस बॅकाचे व्यवहार सुरु होते . इतर सर्व दिवस बॅकाचे तसेच एटीएम सेवा सुध्दा कोलमडते. त्यामुळे हजारो खातेदारांची गैरसोय होत आहे.

Web Title: The bank's financial affairs stopped d in Shelubazaar!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.