पीककर्ज वाटपात बॅंकांचे आडमुठे धोरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:45 AM2021-08-19T04:45:08+5:302021-08-19T04:45:08+5:30
ऑगस्ट महिना अर्धाअधिक संपलेला आहे. खरीपातील मूग, उडीद, सोयाबीन परिपक्व होण्याच्या अवस्थेत आहे. लवकरच पीक काढणीचा हंगाम सुरू होणार ...
ऑगस्ट महिना अर्धाअधिक संपलेला आहे. खरीपातील मूग, उडीद, सोयाबीन परिपक्व होण्याच्या अवस्थेत आहे. लवकरच पीक काढणीचा हंगाम सुरू होणार आहे. असे असताना जिल्ह्यातील अनेक शेतकरी पीककर्जापासून वंचित आहेत. ज्याप्रमाणे ३१ मार्च ही पीक कर्ज भरण्याची अंतिम तारीख आहे. त्यानंतर पीककर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांना पीककर्जावर व्याजमाफी मिळत नाही, त्याचप्रमाणे पीककर्ज वाटपाची निश्चित अंतिम तारीख असावी. त्या तारखेपर्यंत पीककर्ज वाटप न करणाऱ्या बॅंकांवर कारवाई व्हायला हवी, असे निवेदनात नमूद आहे.
...........................
कोट :
खरीप हंगामातील प्रमुख पिके बहरली असून लवकरच काही पिके काढून घेण्याचे काम सुरू होणार आहे. असे असताना अद्यापपर्यंत काही शेतकऱ्यांना बॅंकांकडून पीककर्ज मिळालेले नाही. बॅंकांनी अंगिकारलेला आडमुठेपणाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसत आहे.
- विष्णूपंत भुतेकर
संस्थापक अध्यक्ष, भूमिपुत्र शेतकरी संघटना