बाप्पांचे आज आगमन!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 25, 2017 01:24 AM2017-08-25T01:24:59+5:302017-08-25T01:25:19+5:30

वाशिम: जिल्हय़ात शुक्रवार, २५ ऑगस्ट रोजी सर्वत्र गणेशांची विधिवत स्थापना केली जाणार आहे. पुढील १0 दिवस चालणार्‍या या उत्सवादरम्यान शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याकरिता पोलीस प्रशासनही सज्ज झाले असून, वरिष्ठ अधिकार्‍यांसह १५00 पेक्षा अधिक पोलीस कर्मचारी या उत्सवावर वॉच ठेवणार आहेत. शहरी भागात २४५ तर ग्रामीण भागात ४४१ अशा एकंदरीत ६८६ सार्वजनिक गणेश मंडळांकडून ‘श्रीं’ची स्थापना केली जाणार आहे. यापैकी २१0 गावांत ‘एक गाव, एक गणपती’ची स्थापना होणार आहे. 

Bapapas arrive today! | बाप्पांचे आज आगमन!

बाप्पांचे आज आगमन!

Next
ठळक मुद्दे६८६ सार्वजनिक गणेश मंडळांची होणार स्थापना १५00 पोलीस कर्मचार्‍यांचा वॉच

लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम: जिल्हय़ात शुक्रवार, २५ ऑगस्ट रोजी सर्वत्र गणेशांची विधिवत स्थापना केली जाणार आहे. पुढील १0 दिवस चालणार्‍या या उत्सवादरम्यान शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याकरिता पोलीस प्रशासनही सज्ज झाले असून, वरिष्ठ अधिकार्‍यांसह १५00 पेक्षा अधिक पोलीस कर्मचारी या उत्सवावर वॉच ठेवणार आहेत. शहरी भागात २४५ तर ग्रामीण भागात ४४१ अशा एकंदरीत ६८६ सार्वजनिक गणेश मंडळांकडून ‘श्रीं’ची स्थापना केली जाणार आहे. यापैकी २१0 गावांत ‘एक गाव, एक गणपती’ची स्थापना होणार आहे. 
सुखकर्ता, दुख:हर्ता गणरायांच्या स्वागतासाठी जिल्हावासी सज्ज आहेत. गणेशोत्सव शांततेत साजरा होण्यासाठी पोलीस प्रशासनानेदेखील पोलीस यंत्रणा सज्ज ठेवली आहे. पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एक अपर पोलीस अधीक्षक, दोन पोलीस उपअधीक्षक, १९ पोलीस निरीक्षक, ७0 सहायक पोलीस निरीक्षक व पोलीस उपनिरीक्षक, १0३२ पोलीस कर्मचारी, ४00 होमगार्ड, एसआरपीएफ कंपनी, दोन दंगा नियंत्रण पथक व एक अतिजलद प्रतिसाद पथक असा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. त्याचबरोबरच गुन्हेगारी टोळीविरुद्ध पथक सक्रिय करण्यात आले आहे.
घरगुती गणरायांसोबतच सार्वजनिक गणेश मंडळे विविध ठिकाणी बसविणार्‍या गणेशमूर्तींची प्रतिष्ठापना करण्यासाठी सज्ज झाली आहेत. यावर्षी एकूण ६८६ सार्वजनिक गणेश मंडळांची स्थापना होणार आहे. यामध्ये शहरी भागातील २४५ आणि ग्रामीण भगातील ४४१ गणेश मंडळांचा समावेश आहे. यापैकी २१0 गावांत एक गाव, एक गणपतीची स्थापना होणार आहे. गतवर्षी जिल्हय़ात ६३९ सार्वजनिक गणेश मंडळांची स्थापना झाली होती. यावर्षी ४७ ने गणेश मंडळांची संख्या वाढल्याचे दिसून येते.
वाशिम शहरासह जिल्हय़ात प्रत्येक शहरात गणरायांचे आगमन आणि विसर्जन ही गणेशभक्तांसाठी एक मोठी पर्वणी असते. रस्ते दुरुस्ती, परवाने, होर्डिंग्ज आणि कायदा व सुव्यवस्था या विषयांवर समन्वय साधून सेवा-सुविधांची व्यवस्था करण्यात आल्याचा दावाचा प्रशासनाने केला. वाशिम शहरासह रिसोड, मालेगाव, कारंजा, मंगरुळपीर व मानोरा शहरातील गणेशभक्तांनी गणरायांच्या मुक्कामासाठी मंडप सजावटीची तयारी पूर्ण केली आहे. महागाईची झळ सोसूनही विविध प्रकारच्या मूर्तींची ‘बुकिंग’ करण्यात आलेली आहे. यावर्षी ‘जीएसटी’मुळे १५ टक्के महागाईची झळ सोसून मूर्ती बनविण्याचे काम केले, अशी माहिती वाशिम येथील मूर्तिकार राजेश पेंढारकर यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली. वाशिम येथे डॉ. आंबेडकर चौक ते नगर परिषद चौक मार्गाच्या दोन्ही रस्त्यालगत गणरायांच्या मूर्तीची दुकाने असून, गुरुवारी सायंकाळी या मूर्तींची बुकिंग करण्यासाठी भाविकांनी एकच गर्दी केली होती. 

Web Title: Bapapas arrive today!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.