लग्नपत्रिकेसाठी घेतला जातोय डिजिटल पत्रिकांचा आधार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:43 AM2021-03-23T04:43:31+5:302021-03-23T04:43:31+5:30
गेल्या आठ महिन्यांपासून देशावर आलेल्या कोरोनाचे संकट घोंगावत असल्यामुळे प्रशासनाकडून खबरदारी म्हणून निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामध्ये अनेकांचे लग्नमुहूर्त ...
गेल्या आठ महिन्यांपासून देशावर आलेल्या कोरोनाचे संकट घोंगावत असल्यामुळे प्रशासनाकडून खबरदारी म्हणून निर्बंध लावण्यात आले आहेत. त्यामध्ये अनेकांचे लग्नमुहूर्त हुकले होते. परंतु प्रशासनाकडून विवाह सोहळ्यासाठी मोजक्याच लोकाची परवानगी देण्यात आली असल्याने सध्या सर्वत्र साध्या पद्धतीने लग्नघाई उरकून घेतली जात आहे. ना घोडा, ना वराती अगदी कमी आणि मोजक्या लोकाच्या उपस्थितीत लग्न पार पाडले जात आहेत. तब्बल पाच ते सहा महिने कोणतेही कार्यक्रम सार्वजनिकपणे साजरे करता आले नाही. यानंतर हळूहळू जनजीवन पूर्वपदावर येऊ लागले आणि शासनाने काही मोजक्या लोकाच्या उपस्थितीत कोरोनासंदर्भात घ्यावयाच्या काळजीच्या अधीन राहून शिथिलता आणली. त्यामुळे काढलेले लग्नाचे मुहूर्त आता नव्याने काढून लग्नास सुरुवात झाली आहे. परंतु पुन्हा एकदा कोरोनाचे थैमान सुरू झाल्याने परिस्थीती गंभीर होत चालली आहे. त्यामुळे हाॅट्स ॲपवर लग्नपत्रिका पाठवू डिजिटल पद्धतीने सर्वांना आमंत्रण दिले जात आहे. व या डिजिटल आमंत्रणावर डिजिटल शुभेच्छादेखील दिलेल्या पाहावयास मिळत आहे.