सायबर क्राइमबाबत जागरूक राहावे - अंबुलकर
By admin | Published: July 17, 2017 02:29 AM2017-07-17T02:29:28+5:302017-07-17T02:29:28+5:30
वाशिम : फेसबुक, व्हाटसअप, टिवटर आदींचा वापर करताना कायद्याचा भंग होणार नाही, याची दक्षता घेणे जरूरी आहे. असे प्रतिपादन ठाणेदार सुनील अंबुलकर यांनी केले.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाशिम : सद्या सायबर क्राईमचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. पालक, विद्यार्थी यांनी फेसबुक, व्हाटसअप, टिवटर आदींचा वापर करताना कायद्याचा भंग होणार नाही, याची दक्षता घेणे जरूरी आहे. याप्रती सर्वांनी जागरूक राहायला हवे, असे प्रतिपादन वाशिम ग्रामीण पोलीस स्टेशनचे ठाणेदार सुनील अंबुलकर यांनी १५ जुलै रोजी केले.
स्थानिक माउंट कारमेल स्कुलमध्ये आयोजित स्कुल फिस्ट डे कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी फादर संजय वानखेडे, ऋतुजा अंबुलकर, तरूण क्रांती मंचचे जिल्हाध्यक्ष निलेश सोमाणी, प्रायमरी मुख्याध्यापिका सिस्टर डेलसी, ओबेरॉय, संयोजक गजानन मोहळे यांची प्रमुख उपस्थिती होती. ठाणेदार अंबुलकर व मान्यवरांच्याहस्ते विविध क्षेत्रात नावलौकीक करणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. सोबतच ग्रीन हाऊस, यलो हॉऊस, रेड हाऊस प्रमुखांचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाचे संचालन मिनल मोहळे यांनी केले. कार्यक़्रमास मान्यवरांसह विद्यार्थी, पालक, शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.