सावधान ! सततचा पाऊस देतोय जलजन्य आजारांना आमंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 15, 2021 04:47 AM2021-09-15T04:47:21+5:302021-09-15T04:47:21+5:30
००००००००००००००० दूषित पाण्यामुळे होणारे आजार १) डायरिया, गॅस्ट्रो : डायरिया, गॅस्ट्रोच्या आजारात रुग्णाला उलटी, जुलाब होतात. दूषित पाणी प्यायल्यानंतर ...
०००००००००००००००
दूषित पाण्यामुळे होणारे आजार
१) डायरिया, गॅस्ट्रो : डायरिया, गॅस्ट्रोच्या आजारात रुग्णाला उलटी, जुलाब होतात. दूषित पाणी प्यायल्यानंतर चार ते पाच तासात ही लक्षणं दिसू लागतात. पावसाळ्यात ही लक्षणं साथीच्या आजारासारखी पसरतात. उलटी, जुलाब झाल्याने शरीरातील पाण्याचं प्रमाण कमी होते.
००००००००००००००००
२) कावीळ : दूषित पाण्यामुळे कावीळ आजार होतो. त्यात हेपेटायटिस 'ए' किंवा 'इ' हे प्रकार झाल्याचे आढळतात. दूषित पाणी प्यायल्यानंतर सात ते आठ दिवसांत उलट्या, ताप, लघवी पिवळी होणे किंवा भूक मंदावणं ही लक्षणे दिसतात. चार ते पाच दिवसांनी डोळे पिवळे दिसायला लागतात.
००००००००००००००००
३) टायफॉइड : टायफॉइड हा आणखी एक आजार दूषित पाण्यामुळे होतो. चार ते पाच दिवसांत मोठ्या प्रमाणात ताप येतो. पोटात खूप दुखते. उपचार न घेतल्यास टायफॉइडचे जंतू रक्तात मिसळतात. यामध्ये काही रुग्ण दगावण्याची भीती असते.
००००००००००००००००
आसेगावात डायरियाचे शंभरवर रुग्ण
गेला आठवडाभर सुरू असलेल्या पावसामुळे मंगरूळपीर तालुक्यातील आसेगाव परिसरात पिण्याचे पाणी दूषित होऊन डायरियाचा उद्रेक झाला आहे. बहुतांश ठिकाणी डायरियाचे रुग्ण आढळून येत आहेत. शंभरपेक्षा अधिक लोकांना या आजाराची लागण झाली आहे. त्यात लहान मुलांचे प्रमाण अधिक आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रासह खासगी दवाखान्यात उपचारासाठी गर्दी उसळत आहे.
००००००००००००००००००००
कोट: आसेगावात डायरियाचे अनेक रुग्ण आढळून आले आहेत. तेथे तपासणी मोहीम सुरू आहे. ग्रामसेवकांनी प्रत्येक गावात जलसुरक्षकांच्या मदतीने पिण्याच्या जलस्त्रोतात ब्लिचिंग पावडर टाकून घ्यावे. ग्रामस्थांनी पाणी गाळून, उकळून प्यावे. काही गावांत आरोग्य केंद्र नसेल, तर आवश्यकतेनुसार शिबिरही घेतले जाईल.
-डॉ. अविनाश आहेर,
जिल्हा आरोग्य अधिकारी
०००००००००००००००००००
ही घ्या काळजी!
- पावसाळ्यात पाणी पिताना शुद्ध करून पिणे हा सर्वोत्तम उपाय.
- वॉटर प्युरीफायरचे पाच ते सहा थेंब पिण्याच्या पाण्याच्या भांड्यात टाकावेत. ते
- हॉटेलमधील उघडे पदार्थ, बाहेरचे पदार्थ खाणे टाळावे.
-पाणीपुरी, भेळ अथवा इतर पदार्थ खाणे टाळावे.
-उलट्या, जुलाबांमुळे शरीरातील पाणी कमी होतं. त्यावेळी मीठ-साखर पाणी सतत पित राहावं.
-ओआरएस पावडर एक लिटर पाण्यात टाकून प्यावी.
- शक्य असेल तर नारळाचे पाणी घ्यावे.