सावधान! संक्रांतीच्या वाणातून कोरोना तर पसरत नाही ना?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:39 AM2021-01-20T04:39:30+5:302021-01-20T04:39:30+5:30
अनेकदा संक्रांतीच्या हळदी-कुंकू कार्यक्रमाला एकेका महिलेच्या घरी ५० पेक्षाही अधिक महिलांना आमंत्रण असते. परंतु, यंदा काेराेना संसर्गाचा धाेका नकाे ...
अनेकदा संक्रांतीच्या हळदी-कुंकू कार्यक्रमाला एकेका महिलेच्या घरी ५० पेक्षाही अधिक महिलांना आमंत्रण असते. परंतु, यंदा काेराेना संसर्गाचा धाेका नकाे म्हणून १० महिलांचा गट करून प्रत्येक गटाला वेगवेगळ्या दिवशी आमंत्रित केले. जेणेकरून एकाच दिवशी गर्दी हाेणार नाही, असे काही महिलांनी सांगितले. काही महिलांनी हळदी-कुंकवासाठी आमंत्रित करण्यात आलेल्या महिलांसाठी सॅनिटायझरचीही व्यवस्था केल्याचे सांगण्यात आले. काहींनी मात्र याकडे दुर्लक्ष केल्याचे सांगण्यात आले. या कार्यक्रमातून काेराेना संसर्ग पसरण्याची दाट शक्यता असल्याने काही महिलांनी खबरदारी घेतली, तर काही महिला दरवर्षीप्रमाणेच कार्यक्रमाचे आयाेजन करीत असल्याचे महिलांनी सांगितले.
....................
कोरोना पसरतोय...
पॉझिटिव्ह मृत्यू
१३ जानेवारी ११ ०१
१४ जानेवारी १७ ००
१५ जानेवारी २८ ००
१६ जानेवारी १२ ००
१७ जानेवारी ३३ ००
१८ जानेवारी १६ ००
..................
लस आली तरी; धोका कायम
वाणाला जात असताना किंवा वाण घेण्यासाठी घरात कोणी आले असताना तोंडाला मास्क लावायला विसरू नका. सोबत सॅनिटायझरही अवश्य ठेवा. लस आली म्हणून दुर्लक्ष करू नका. लस घेतल्यानंतरही काळजी घेणे आवश्यक आहे.