‘सीम व्हेरिफिकेशन पेंडिंग’ असा मेसेज आल्यास सावधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 3, 2021 04:29 AM2021-06-03T04:29:14+5:302021-06-03T04:29:14+5:30

वाशिम : माेबाईल सीम व्हेरिफिकेशन करायचे आहे, असा मेसेज किंवा काॅल आपल्यासाठी धाेकादायक ठरू शकताे. काही क्षणातच आपल्या बॅंक ...

Be careful if you get a message like 'Seam Verification Pending' | ‘सीम व्हेरिफिकेशन पेंडिंग’ असा मेसेज आल्यास सावधान

‘सीम व्हेरिफिकेशन पेंडिंग’ असा मेसेज आल्यास सावधान

googlenewsNext

वाशिम : माेबाईल सीम व्हेरिफिकेशन करायचे आहे, असा मेसेज किंवा काॅल आपल्यासाठी धाेकादायक ठरू शकताे. काही क्षणातच आपल्या बॅंक खात्यातील रक्कम रिकामी हाेऊन आपली वैयक्तिक माहिती सायबर गुन्हेगाराच्या हाती जाऊ शकते. त्यासाठी असे मेसेज आल्यास नागरिकांनी सावध राहणे गरजेचे आहे. दाेन वर्षात जिल्ह्यात असे १९ प्रकार असे घडले आहेत.

तंत्रज्ञानात माेठया प्रमाणात बदल झाला आहे. सध्याच्या घडीला माेबाईलवरून सर्व कामे केली जात आहेत. माेबाईल जेवढा साेयीचा तेवढाच घातक ठरत आहे. अनेक जण आपल्या माेबाईलमध्ये नवनवीन ॲप्स डाऊनलाेड करताना सर्व शर्थी मान्य करतात. थाेडेही वाचून काेणीच घेत नाही. याचाच अर्थ आपण आपल्या माेबाईलमध्ये असलेला संपूर्ण डाटा त्यांच्या स्वाधीन करताेय. त्यामुळे काेणतेही ॲप्स डाऊनलाेड करताना याचा विचार हाेणे गरजेचे आहे. विशेष म्हणजे अनेक सायबर गुन्हेगार माेबाईल कंपनीचे नाव सांगून व्हेरिफिकेशन करून घेण्याच्या नावाखाली आपल्या बॅंकेसंदर्भात, आधार कार्डसंदर्भात माहिती जाणून घेऊन फसवणूक करू शकतात. याकरिता सावधानता बाळगणे आवश्यक आहे.

.........

काेणतीही वयक्तिक माहिती नकाे

काेणतेही ॲप्स डाऊनलाेड करण्यापूर्वी अनेक जण दिलेल्या अटी मान्य करतात. तसेच वयक्तिक माहिती देऊन टाकतात. यामुळे माहिती देताना काळजी घेणे आवश्यक.

..........

असा काॅल व मेसेज आल्यास राहा सावधान

आपल्या माेबाईलचे व्हेरिफिकेशन पेंडिंग आहे. ते ताबडताेब न केल्यास आपला माेबाईल बंद करण्यात येईल, असा मेसेज आल्यास थेट कंपनीच्या व्यक्तिशी संपर्क साधावा.

.............

माेबाईल व्हेरिफिकेशन किंवा आपण लॅपटाॅप जिंकला आहे, अशा प्रकारचे मेसेज किंवा काॅल आल्यास ते आपल्याकडून बॅंक पासबुक व इतर डिटेल मागतात, ते देऊन स्वत:ची फसवणूक करू नये.

............

काेणत्याही अनाेळखी क्रमांकावरून विविध प्रलाेभने दाखवणारे काॅल आल्यास ताे घेणे टाळावा. अनेक जण आधार कार्ड, पॅनकार्डची डिटेल देऊन स्वत:ची फसवणूक करून घेतात. तेव्हा याबाबत खबरदारी घ्यावी.

............

सीम व्हेरिफिकेशनसाठी किंवा आपणास काही बक्षीस लागले, आपल्या बेस्ट युजर्स म्हणून एखादया कंपनीच्या नावाने काेणी जर माेबाईलवर काॅल करीत असेल तर सावधान राहा. हे काॅल फेक असल्याने आपली फसवणूक हाेण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशावेळी नजीकच्या पाेलीस स्टेशनशी संपर्क करा.

राजकुमार वाढवे, सायबर प्रमुख, वाशिम

Web Title: Be careful if you get a message like 'Seam Verification Pending'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.