सावधान ! ग्रामीण भागांत वाढतोय डेंग्यू, हिवताप, टायफॉइडचा प्रादुर्भाव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2021 04:48 AM2021-09-17T04:48:48+5:302021-09-17T04:48:48+5:30
०००००००००००००००००००००० जिल्हा शल्य चिकित्सकांचा कोट १) कोट : गेल्या महिनाभरात आठवड्यांत डेंग्यूसदृश आजारासह हिवतापाच्या रुग्णांमध्ये वाढ दिसून आली आहे. ...
००००००००००००००००००००००
जिल्हा शल्य चिकित्सकांचा कोट
१) कोट : गेल्या महिनाभरात आठवड्यांत डेंग्यूसदृश आजारासह हिवतापाच्या रुग्णांमध्ये वाढ दिसून आली आहे. दररोज बाह्यरुग्ण विभागात उपचारासाठी येणारे बहुतांश रुग्ण हे तापाचे असतात. नागरिकांनी निष्काळजीपणा न करता आरोग्याची काळजी घेणे गरजेचे आहे.
- डॉ. मधुकर राठोड,
जिल्हा शल्यचिकित्सक,
०००००००००००००
लहान मुलांचे प्रमाण जास्त
- सध्या मुलांमध्ये विषमज्वर व डेंग्यूसदृश आजाराचे प्रमाण वाढलेले आहे. म्हणून पालकांनी दुर्लक्ष न करता मुलांनी विशेष काळजी घ्यावी.
- पावसाळ्यात पाणी साचल्याने त्यात डासांची उत्पत्ती होते, यामुळे डेंग्यू व चिकुनगुनिया हा आजार होतो. डासांच्या उत्पत्तीची ठिकाणे शोधून ती नष्ट करा, घराबाहेर पाणी साचू देऊ नका, परिसरात वेळोवेळी फवारणी करा.
०००००००००००००००००००००
रोज किमान १० पेशंट
जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत सततच्या पावसामुळे वातावरणात बदल होऊन विविध आजार वाढले आहेत. त्यात डेंग्यूसदृश आजारासह हिवताप आणि टॉयफॉइडच्या आजारांचा समावेश असला तरी दिवसाला डेंग्यूसदृश आजारासह हिवतापाचे १० रुग्ण आढळून येत आहेत.
काय आहेत लक्षणे?
टॉयफॉइड :
विषमज्वर झालेल्या रुग्णाच्या अंगात सामान्यत: १०४ अंश ते १०४ फॅरेनहिट (३९ ते ४० अंश) ताप सतत असतो. त्यांना अशक्त वाटते किंवा पोटात वेदना असतात. डोकेदुखी किंवा भूक कमी लागणे, अशी लक्षणे दिसतात.
००००००००००००००
डेंग्यू : डेंग्यूच्या लक्षणांमधे अचानक उच्च-ताप येणे, तीव्र डोकेदुखी, मळमळ, डोळ्यांच्या मागे वेदना होणे, सांधेदुखी होणे, अति थकवा येणे, शारीरिक वेदना होणे, भूक हरवणे आणि त्वचेवर पुरळ येणे यांचा समावेश होतो. ताप आणि इतर लक्षणे जवळजवळ एक आठवडे टिकतात.
०००००००००००००००००००००००००
हिवताप :
-सामान्यत: हिवताप आजारात थंड अवस्था, उष्ण अवस्था आणि घाम येण्याची अवस्था या तीन अवस्था असतात.
-थंड अवस्थेत थकवा, डोकेदुखी, मळमळ, थंडी वाजणे आणि त्यानंतर हुडहुडी भरणे अशी लक्षणे दिसतात. ताप त्वरेने वाढत जातो.
-उष्ण अवस्थेत शरीराचे तापमान खूप वाढते तसेच त्वचेस स्पर्श केल्यास त्वचा गरम व कोरडी भासते. मात्र, उलट्या नाहीशा होतात.
- घाम येण्याच्या अवस्थेत घाम येऊन ताप कमी होतो. तापमान त्वरेने कमी होऊन त्वाचा थंड आणि घामेजते.
०००००००००००००००००००
जिल्ह्यातील आकडेवारी :
टॉयफॉइड -३२
डेंग्यूसदृश - ८५
हिवताप - १२