संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी सज्ज राहा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 29, 2021 04:27 AM2021-06-29T04:27:27+5:302021-06-29T04:27:27+5:30

२८ जून रोजी दूरदृश्य प्रणालीद्वारे कोविड-१९ संसर्गाच्या पार्श्वभूमीवर करावयाच्या उपाययोजनांबाबत त्यांनी आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी शन्मुगराजन एस., पोलीस अधीक्षक ...

Be prepared to face a potential third wave | संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी सज्ज राहा

संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना करण्यासाठी सज्ज राहा

Next

२८ जून रोजी दूरदृश्य प्रणालीद्वारे कोविड-१९ संसर्गाच्या पार्श्वभूमीवर करावयाच्या उपाययोजनांबाबत त्यांनी आढावा घेतला. यावेळी जिल्हाधिकारी शन्मुगराजन एस., पोलीस अधीक्षक वसंत परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी शैलेश हिंगे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. मधुकर राठोड, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शंकर तोटावार, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रभारी प्रकल्प संचालक डॉ. विनोद वानखेडे यांची प्रमुख उपस्थिती होती.

पालकमंत्री देसाई म्हणाले, जिल्ह्यात ऑक्सिजनचा आणि औषधींचा साठा पुरेशा प्रमाणात उपलब्ध ठेवावा. ऑक्सिजन तुटवडा निर्माण होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी. कोरोनाला प्रतिबंध करण्यासाठी पात्र व्यक्तींचे लसीकरण लवकरात लवकर पूर्ण होईल, याकडे लक्ष द्यावे. कोविशिल्ड व कोव्हॅक्सिन या दोन्ही लसींचा पुरवठा नियमित स्वरुपात होण्यासाठी जिल्हा शल्य चिकित्सक आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी पाठपुरावा करून नियोजन करावे, असे पालकमंत्री म्हणाले.

जिल्ह्यात अनलॉकच्या तिसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू करण्यात आले असून या काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही, याबाबत दक्षता घ्यावी. खरीप हंगामातील पेरणी प्रक्रिया जवळपास आटोपली आहे. बियाणे उगवले नाही, रासायनिक खत उपलब्ध होत नाही, अशा स्वरूपाच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी येऊ नयेत, यासाठी कृषी विभागाने सतर्क राहून काम करावे.

........................

२७ टक्के नागरिकांचे लसीकरण- जिल्हाधिकारी

जिल्हाधिकारी शन्मुगराजन एस. म्हणाले, कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेची शक्यता लक्षात घेता आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आल्या आहेत. आवश्यक प्रमाणात ऑक्सिजन व औषधीचा साठा उपलब्ध आहे. आतापर्यंत २७ टक्क्यापेक्षा अधिक नागरिकांचे लसीकरण पूर्ण झाले, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली.

Web Title: Be prepared to face a potential third wave

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.