कोरोना रुग्णांसाठी शहरामध्ये बेड्स उपलब्ध; पण पैसे मोजून!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 23, 2021 04:43 AM2021-03-23T04:43:26+5:302021-03-23T04:43:26+5:30

आरोग्य विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, वाशिम शहरात डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये ५० बेड्स उपलब्ध आहेत. त्यापैकी ४४ बेड्स भरलेले असून ६ ...

Beds available in the city for corona patients; But counting the money! | कोरोना रुग्णांसाठी शहरामध्ये बेड्स उपलब्ध; पण पैसे मोजून!

कोरोना रुग्णांसाठी शहरामध्ये बेड्स उपलब्ध; पण पैसे मोजून!

Next

आरोग्य विभागाकडून प्राप्त माहितीनुसार, वाशिम शहरात डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये ५० बेड्स उपलब्ध आहेत. त्यापैकी ४४ बेड्स भरलेले असून ६ बेड्स रिक्त आहेत. डेडिकेटेड कोविड हेल्थ सेंटरमध्ये १५० बेड्स असून ३७ वर रुग्ण भरती आहेत; तर ११३ बेड्स रिक्त आहेत. रेनॉल्ड्स हॉपिटलमध्ये ३० पैकी २२ बेड्स सध्या रिक्त असून पल्स क्रिटिकल केअर हॉस्पिटलमधील सर्वच अर्थात २० बेड्सवर रुग्णांवर उपचार सुरू आहेत. दरम्यान, शहरातील रेनॉल्ड हॉस्पिटल आणि पल्स क्रिटिकल केअर हॉस्पिटल हे खासगी असून त्या ठिकाणी उपचार घेण्यासाठी बक्कळ पैसे मोजावे लागत असल्याचे दिसून येत आहे.

...............................

अशी आहे बेड्सची आकडेवारी

कोरोना रुग्णांसाठी शहरात उपलब्ध बेड्स

उपलब्ध - २५०

रिकामे - १४१

शासकीय रुग्णालय

उपलब्ध - २००

रिकामे - ११९

खासगी रुग्णालये

उपलब्ध - ५०

रिकामे - २२

.....................

खासगी रुग्णालयांत काय दर?

ऑक्सिजन - ४४००

आयसीयू - ७५००

व्हेंटिलेटर आयसीयू - ९०००

.................

राखीव खाटा नावालाच

वाशिम शहरासह संपूर्ण जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्ण ठेवण्याकरिता शासकीय व खासगी अशी सहा रुग्णालये आहेत. त्यातील राखीव खाटा नावालाच असून खासगीत रुग्णांना मोठ्या प्रमाणात पैसे खर्च करावे लागत आहेत.

Web Title: Beds available in the city for corona patients; But counting the money!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.