लोकवर्गणीतुन भूमिगत गटार व रस्त्याच्या कामाला सुरुवात

By admin | Published: June 27, 2017 01:56 PM2017-06-27T13:56:22+5:302017-06-27T13:56:22+5:30

ग्रामस्थांनी लोकवर्गणीतुन भूमिगत गटार व रस्त्याच्या कामाला सुरुवात केली आहे.

Beginning of underground sewer and road work through public category | लोकवर्गणीतुन भूमिगत गटार व रस्त्याच्या कामाला सुरुवात

लोकवर्गणीतुन भूमिगत गटार व रस्त्याच्या कामाला सुरुवात

Next

प्रभारी बिडीओंनी केली पाहणी : ग्रा.पं.च्या भोंगळ कारभाराविषयी नागरिकांमध्ये रोष
मानोरा : मानोरा पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या मौजे सोमठाणा ग्रामपंचायतच्या निष्क्रीयतेला कंटाळुन गोकुळ नगरीमध्ये ग्रामस्थांनी लोकवर्गणीतुन भूमिगत गटार व रस्त्याच्या कामाला सुरुवात केली आहे. याबाबत प्रभारी बिडीओ यांनी पाहणी करुन सरपंच, सचिवाला पाचरण करुन माहिती जाणुन घेणार असल्याचे आश्वासन त्यांनी ग्रामस्थांना दिले आहे.
मानोरा शहराला लागुनच असलेल्या सोमठाणा ग्रा.पं.अंतर्गतच्या गोकुळनगरी येथे विकासाची भूमिगत गटार , रस्ता काम व पाण्यासाठी पाईप लाइृनचे काम व्हावे यासाठी वारंवार ग्रामस्थांनी भेटी घेवुन संपर्क केला. तेव्हा कामाला सुरुवात  करु परंतु टॅक्सची भरणा करावी असे सांगुन वर्षभरापुर्वी लोकांकडून लाखो रुपये टॅक्सची भरणा करुन घेतली. मात्र कामाला सुरुवात केली नाही.तेव्हा नागरिकांनी वेळोवेळी ग्रा.पं.सचिव, सरपंच याच्याशी विकास काम सुरु करण्याबाबत विनवणी केली.पण कामाला सुरुवात करण्यात आली नाही. ग्रामपंचायतच्या भोंगळ कारभाराला कंटाळुन शेवटी पावसाळ्यापुर्वी आपणच आपल्या भागाचे काम करु असे १५ ते १६ नागरिकांनी ठरविले. तेव्हा ५० ते ६० हजार रुपये लोक वर्गणी करुन भूमिगत गटार व रस्ता कामाला सुरुवात करण्यात आली आहे

Web Title: Beginning of underground sewer and road work through public category

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.