पंतप्रधान आवास योजनेपासुन लाभार्थी वंचीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2017 07:04 PM2017-09-20T19:04:56+5:302017-09-20T19:59:36+5:30
मंगरुळपीर : तालुक्यातील गटग्रामपंचायत चांभई व बालदेव येथील ग्रामस्थानी पंतप्रधान आवास योजनेचा लाभ मिळावा यासाठी आवश्यक कागदपत्राची पुर्तता करुन प्रस्ताव सादर केले,परंतु अद्याप यादीत नाव समावीष्ट झाले नाही. या प्रस्तावीत लाभाथ्यार्ना याचा लाभ द्यावा या मागणीसाठी येथील ग्रामस्थानी गटविकास अधिकारी यांचेकडे लेखी निवेदनाव्दारे १८ रोजी मागणी केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

सदर निवेदनाचा आशय असा की १ आॅक्टोंबर २०१६ रोजी चांभई व बालदेव येथील ग्रामस्थानी पंतप्रधान आवास योजनेचा लाभ व्हावा यासाठी कागदपत्राची पुर्तता करुन व तसेच सचिव, सरपंच यांचे स्वाक्षरी व शिक्के घेऊन तपासणी करुन रितसर अर्ज सादर केले होते, परंतु अद्याप प्रशासनाकडुन दखल घेतली नाही. त्यामुळे गरजुंना योजनेचा लाभ झाला नाही.सादर केलेले प्रस्ताव अचुक असतांनाही जाणीवपुर्वक योजनेपासुन वंचीत ठेवण्याचा प्रशासनाचा मनसुबा असल्याचे निदर्शनास येत आहे शासनाच्या कल्याणकारी योजना आहेत, परंतु प्रत्यक्ष अंमलबजावणी करणारे अधिकारी कर्मचारी याच्या कामचुकार वृत्तीमुळे शासनाच्या उद्देशाला तडे जात आहे ही गंभीर असुन याकडे वरिष्ठानी लक्ष देऊन सखोल चौकशी करावी अशी मागणी निवेदनातुन करण्यात आली आली आहे.या निवेदनावर नंदकिशोर चांभारे ,रमेश रोकडे अरुण फुके, निर्मला गांवडे, विश्वनाथ देवळे ,भगवंता रोकडे, विशाल फुके यासह २४ स्वाक्षºया आहेत.