‘योजनांपासून लाभार्थी वंचित राहता कामा नये’, जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

By संतोष वानखडे | Published: August 22, 2023 03:32 PM2023-08-22T15:32:49+5:302023-08-22T15:34:00+5:30

जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात शासन आपल्या दारी उपक्रमाच्या तयारीचा आढावा घेताना त्या बोलत होत्या. 

"Beneficiaries should not be deprived of the schemes", instructions of the Collector | ‘योजनांपासून लाभार्थी वंचित राहता कामा नये’, जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

‘योजनांपासून लाभार्थी वंचित राहता कामा नये’, जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

googlenewsNext

वाशिम : ‘शासन आपल्या दारी’ या उपक्रमांतर्गत वैयक्तिक लाभाच्या कोणत्याही योजनांपासून एकही लाभार्थी वंचित राहणार नाही याबाबत दक्षता घेण्याचे निर्देश जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी सोमवारी (दि.२१) दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील वाकाटक सभागृहात शासन आपल्या दारी उपक्रमाच्या तयारीचा आढावा घेताना त्या बोलत होत्या. 

यावेळी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वसुमना पंत, निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, उपजिल्हाधिकारी कैलास देवरे, मोहन जोशी, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी आरिफ शहा, जिल्हा नियोजन अधिकारी सुनीता आंबरे, राजेश सोनखासकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ सुहास कोरे, उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर, सखाराम मुळे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक किरण कोवे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संजय जोल्हे व दिगंबर लोखंडे यांची प्रमुख उपस्थिती होती. जिल्हाधिकारी बुवनेश्वरी यांनी शासन आपल्या दारी या उपक्रमाअंतर्गत लाभ देण्यात येणाऱ्या लाभार्थ्यांची सर्व विभागांनी यादी निश्चित करावी, अशा सूचना दिल्या. 

पुढच्या महिन्यात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री वाशिमात

सप्टेंबर महिन्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व अजित पवार यांच्या उपस्थितीत वाशिम येथे शासन आपल्या दारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असल्याचे जवळपास निश्चित झाले आहे. त्याअनुषंगाने प्रशासकीय यंत्रणा पूर्वतयारीला लागल्याचे दिसून येते.

सर्व विभागांनी राबविण्यात येणाऱ्या योजना निश्चित करून किती लाभार्थ्यांना या उपक्रमांतर्गत लाभ देता येईल याची माहिती उपलब्ध करून द्यावी. वैयक्तिक लाभाच्या कोणत्याही योजनांपासून या उपक्रमादरम्यान एकही लाभार्थी वंचित राहणार नाही याबाबत दक्षता घ्यावी. ज्या लाभार्थ्यांना या उपक्रमादरम्यान आतापर्यंत लाभ देण्यात आला आहे, त्याची माहिती व त्यांचे भ्रमणध्वनी क्रमांक विहित नमुन्यात नमूद करावे, असे निर्देशही दिले. सभेला सर्व यंत्रणांचे प्रमुख अधिकारी,सर्व तहसीलदार,गटविकास अधिकारी व मुख्याधिकारी यांची उपस्थिती होती.

Web Title: "Beneficiaries should not be deprived of the schemes", instructions of the Collector

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :washimवाशिम